पाहाः सोनाक्षीच्या अकिरासाठी अक्षयचा हा वेगळा अंदाज

सिनेमाला प्रमोट करताना अक्षय महिला सशक्तिकरणावरही बोलत आहे

सोनाक्षी सिन्हाची ‘दबंग’गिरी तिच्या आगामी सिनेमा ‘अकिरा’मध्ये पाहता येणार आहे. अॅक्शनपट असलेल्या या सिनेमात सोनाक्षी अन्यायाच्या विरुद्ध लढताना दिसत आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार हा सिनेमा बघायला उत्सुक आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने वेगळ्या पद्धतीने सोनाक्षी सिन्हाच्या ‘अकिरा’ला प्रमोट केलं आहे.
या व्हिडिओमध्ये अक्षय सांगतो की यावेळी तो जुन्या लखनऊमध्ये आहे. त्याच्या मागे गोमती नदी आहे. ज्या प्रकारे देशाच्या महिला इतिहास रचत आहेत यामुळे मला खूप आनंद होत आहे. काही दिवसांमध्ये सोनाक्षीही हे सिद्ध करुन दाखवणार आहे ते तिच्या आगामी अकिरा सिनेमामधून. यात किक मारणारी भारतीय महिला खऱ्या अर्थाने कशी असते हे दिसेल. ‘अकिरा’ सिनेमाला प्रमोट करण्याचा एक वेगळा अंदाज यावेळी अक्षयने वापरला. यात अक्षय कुमारचा बोलण्याचा अंदाज आणि त्याचं बोलणं तुम्हाला नक्कीच आवडेल. या सिनेमाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास यांनी केले आहे. हा सिनेमा २ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘अकिरा’मध्ये राजस्थानमधून मुंबईत आलेल्या मुलीची कथा सांगण्यात आली आहे. ‘अकिरा’मध्ये सोनाने अकिरा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘अकिरा’ जोधपूरवरून मुंबईला शिकायला येते आणि अचानक कॉलेजमधील एका आत्महत्या प्रकरणात तिला गोवण्याचे प्रयत्न होतो. पण अकिरा भ्रष्ट व्यवस्था आणि भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध उभी राहते. ट्रेलरमधील सोनाचा अ‍ॅक्शन अवतार जितका पाहण्यासारखा आहे, तितकेच या व्हिडिओतील अकिराचे पंचही पाहण्यासारखे आहेत.
अक्षयने ‘राउडी राठोड’ आणि ‘हॉलीडे’ या सिनेमात सोनाक्षी बरोबर काम केले आहे. या व्हिडिओत ‘अकिरा’ सिनेमाला प्रमोट करताना अक्षय महिला सशक्तिकरणावरही बोलत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Watch video akshay kumar cheers for sonakshi sinhas akira

ताज्या बातम्या