VIDEO : चंदन कपिलसमोर विमानातील ‘त्या’ वादाची आठवण काढतो तेव्हा…

शोमध्ये चंदनचा कपिलला उपहासात्मक टोला

kapil sharma, chandan prabhakar
कपिल शर्मा, चंदन प्रभाकर

‘द कपिल शर्मा शो’मधून नाराज होऊन बाहेर पडलेला कपिलचा सहकलाकार आणि बालमित्र चंदन प्रभाकर शोमध्ये परतलाय. शोमध्ये वापसी केलेल्या चंदनचे स्वागतदेखील जोरदार झाले. प्रेक्षकांसोबतच नवजोत सिंग सिद्धू यांनीदेखील उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. ‘चंदू चहावाला’ शोमध्ये परतल्याचा आनंद कपिलच्याही चेहऱ्यावर दिसून येत होता. मनातील कटूता दूर करत कपिलच्या शोमध्ये परतण्याचा निर्णय घेऊन चंदनने कपिलसोबतची मैत्री कायम ठेवल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे चंदन मंचावर परतल्यावर ‘अपने तो अपने होते है’ हे गाणं लावण्यात आलं. शोच्या या भागातही नेहमीप्रमाणे चंदन आणि कपिल एकमेकांची खिल्ली उडवताना दिसले.

शोच्या टीझरमध्ये चंदनच्या वापसीबद्दल जेव्हा सिद्धूंनी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की, ‘नाही, मी कपिलच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो आहे. त्याला रुग्णालयात दाखल केल्याचं मी ऐकलं होतं.’ चंदूच्या या उपहासात्मक उत्तरावर कपिलही खिल्ली उडवताना दिसतो. महत्त्वाचे म्हणजे ज्या घटनेवरून या दोन मित्रांमध्ये वाद झाला, त्या विषयाचा उल्लेख चंदनने आवर्जून शोच्या या भागात केला.

वाचा : या अभिनेत्याच्या वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी केलेली पत्नी-मुलीची हत्या 

ऑस्ट्रेलियातील अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करण्याची इच्छा होती. मात्र जेव्हा आम्ही परतलो, तेव्हा अगोदरच इंटरनेटवर बातमी आणि फोटो व्हायरल झाले होते, अशा शब्दांत चंदनने कपिलची खिल्ली उडवली. मेलबर्नहून मुंबईमध्ये परतत असताना कपिलने मद्यधुंद अवस्थेत सुनील ग्रोवरला शिवीगाळ केली होती. एवढेच नाही तर त्याच्या दिशेने कपिलने बूटही फेकला होता. यावेळी अली आणि चंदनसोबतही कपिल उद्धटपणे वागला होता. इतकंच नव्हे तर तू मला कसा काय विसरलास असा प्रश्न जेव्हा कपिलने त्याला विचारला तेव्हा, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त तू बातम्यांमध्ये झळकतोस, तुला कोणी कसं विसरू शकेल?’ या चंदनच्या उत्तराने सेटवर हास्यकल्लोळ झाला.

शनिवारी आणि रविवारी प्रसारित होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये डॉ. राहत इंदोरी, डॉ. कुमार विश्वास आणि शबीना अदीब हे पाहुणे या आठवड्यात येणार आहेत. चंदन प्रभाकर आणि भारती सिंग कपिलच्या शोमध्ये आल्याने आता ‘द कपिल शर्मा शो’ आणि कृष्णा अभिषेकच्या ‘ड्रामा कंपनी’मध्ये स्पर्धा नक्कीच वाढणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Watch video of chandan prabhakar returns to the kapil sharma show and reminds about australia and their fight

ताज्या बातम्या