Samantha-Naga Chaitanya wedding : गोष्ट नाग चैतन्य- समंथाच्या प्रेमाची, परिकथेतील लग्नाची…

Samantha-Naga Chaitanya wedding : या सेलिब्रिटी जोडप्याच्या लग्नात नेमकी किती धमाल झाली होती, याचा अंदाच हा टीझर पाहून लावता येत आहे.

Samantha - Naga Chaitanya wedding
Samantha-Naga Chaitanya wedding समंथा रुथ प्रभू, नाग चैतन्य

”Samantha- Naga Chaitanya wedding” दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची वाढती लोकप्रियता पाहता त्या चित्रपटसृष्टीतील कलाकार आता अनेकांच्या फेव्हरेट लिस्ट्चा भाग झाले आहेत. अशा या कलाकारांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या काही चेहऱ्यांपैकीच असणारी एक सेलिब्रिटी जोडी म्हणजे नाग चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू. सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नाग चैतन्य आणि समंथा गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. गोव्यात अत्यंत दिमाखदार सोहळ्यात त्या दोघांनीही लग्नगाठ बांधली होती. ज्यानंतर जवळपास सात महिन्यांनी त्यांच्या वेडिंग मुव्हीचा टीझर सर्वांच्या भेटीला आला आहे.

समंथा आणि नाग चैतन्यच्या लग्नाची सोशल मीडियावरही बरीच चर्चा झाली होती. इतकच नव्हे तर #ChaySam हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला होता. लग्नाच्या त्याच सुरेख आठवणी जागवत समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा टीझर शेअर केला आहे.

वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत

Samantha-Naga Chaitanya wedding : काय आहे टीझरमध्ये?

लग्नाच्या संपूर्ण गोतावळ्यात वधू- वराच्या मनात असणारी भीती वगैरे हे जे काही समज आहेत, ते मोडित काढत या व्हिडिओमध्ये समंथा आणि नाग चैतन्य त्यांच्या लग्नाचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत. त्याशिवाय लहानसहान गोष्टी कुठे ठेवल्या आहेत, यावरुन होणारी शोधाशोध वगैरेची झलकही या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या सेलिब्रिटी जोडप्याच्या लग्नात नेमकी किती धमाल झाली होती, याचा अंदाच हा टीझर पाहून लावता येत आहे. मुख्य म्हणजे खऱ्या अर्थाने आपण एखाद्या परिकथेत आलो आहोत, याचीच क्षणार्धासाठी अनुभूती होतेय. तेव्हा आता समंथा आणि नाग चैतन्यच्या लग्नाचा संपूर्ण व्हिडिओ कधी एकदा चाहत्यांच्या भेटीला येतो, याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Watch video south indian actress samantha ruth prabhu naga chaitanya fairy tale wedding

ताज्या बातम्या