गेल्या एक दशकापासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांत दमदार काम केलं आहे. तेजस्विनी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. काही वर्षांपूर्वी तेजस्विनीचे वडिल रणजित पंडित यांचे निधन झाले. दरम्यान काल त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

तेजस्विनीने काल वडिलांच्या वाढदिवसानिमित्त दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत दोन चमचे दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटो ती आणि तिचे वडिल दिसत आहे. हे दोन्ही फोटो शेअर करत तिने एक भावनिक पोस्ट केली आहे. यात सर्वात शेवटी तिने “आजही तुला तितकंच miss करतो आम्ही बाबा !” असे लिहिले आहे.

Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट

“मला अनेकांनी विचारलं तुझं prized possession काय आहे…..?!
घड्याळ, अंगठ्या, कपडे, पर्स,soft toys की आणखी काही…..”

“काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल…! तर ह्या त्या 2 गोष्टी आहेत. माझं माझ्या बाबांवरचं प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. बाबा ने मला माणूस म्हणून घडवलं….बाबाने मला संस्कारासोबत आणखी काय दिलं तर एक चांगला Cook होण्याचा वारसा बाबा देऊन गेला, ठेऊन गेला….हे 2 चमचे आमच्याकडे माझा जन्म झाला तेंव्हापासून आहेत. आम्ही मोठ्या होत असताना बाबा catering student आणि आमचं चहा पावडरचं दुकान होतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हा बहिणींना चहा करायला शिकवला. ” असे तिने यात म्हटले आहे.

“आमच्याकडे चहा वेगळ्या पद्धतीने बनतो. आणि तो perfect लागतो असं मला वाटतं. त्या चहा पावडर च्या मापाचा हा एक चमचा. आणि दुसरा तो साखरेचा चमचा. त्याची दांडी तुटली आहे . पण आजतागायत तो चमचा कधी replace झाला नाही. कारण स्वयंपाकातील “प्रमाण” ह्याचं आमच्या घरी जाम महत्व….हे चमचे फक्त माझ्या बाबाची आठवण नसून आमच्या संस्कारातल्या , शिकवणीचं प्रमाण आहे. ज्यावर माझं “प्रमाणाबाहेर” प्रेम आहे.” असेही ती म्हणाली.

हेही वाचा : ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ला दोन पुरस्कार ; जितेंद्र जोशी सर्वोत्कृष्ट अभिनेते

“तोलून मापून चहा करता येईल पण बाबावरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य ! आज त्याच्या वाढदिवसा निमित्त लिहावसं वाटलं कारण बाबा चे खूप photos नाहियेत आमच्याकडे. कॅमेराचं महत्व मला कळायच्या आधीच त्याने exit घेतली. आजही तुला तितकंच miss करतो आम्ही बाबा ! जिथे कुठे असशील, देव बरे करो…Happy Birthday Baba ?,” अशी पोस्ट तेजस्विनीने केली आहे. दरम्यान तेजस्विनी पंडितची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.