छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रचंड यश मिळविल्यानंतर एकता कपूरने तिचा मोर्चा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळविला आहे. एकताने ‘अल्ट बालाजी’ हे नवीन वेबसीरिज अॅप सुरु केलं असून काही दिवसापूर्वी यातील ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजमुळे एकताला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावं लागलं. या अॅपवर प्रदर्शित झालेल्या सीरिजमध्ये भारतीय जवानांचा अपमान केल्याचं हिंदुस्तानी भाऊ या युट्युबरने म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एकताला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र अखेर या प्रकरणी एकताने तिचं मौन सोडलं असून तिचं मत व्यक्त केलं आहे.

अलिकडेच एकताने एक मुलाखतीत बोलत असताना तिच्यावर करण्यात आलेले आरोप, सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग यावर तिचं मत मांडलं आहे. तसंच भारतीय जवानांचा अपमान केल्याचा आरोप करण्याविषयीदेखील तिने स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या तिच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
accused in child sexual abuse case arrest after three years
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक

“आम्ही देशाचे नागरिक आहोत, या समाजाचा एक भाग आहोत. त्यामुळे भारतीय लष्कराविषयी आमच्या मनात कायमच आदर आहे आणि असेल. आपल्या देशासाठी आणि देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कर कायमच सज्ज आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहेच. मात्र या सीरिजमध्ये दाखविण्यात आलेल्या काही दृश्यांमुळे मला ट्रोल केलं जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आम्ही ती दृष्य कधीच हटविली आहेत. तसंच या प्रकरणी आम्ही योग्य ते पावलेही उचलली आहेत. मात्र तरीदेखील काही जण आम्हाला धमकी देत आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे”, असं एकता म्हणाली.

दरम्यान, एकताने सुरु केलेल्या ‘अल्ट बालाजी’ या वेबसीरिज अॅपवर काही दिवसांपूर्वी ‘ट्रिपल एक्स’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजच्या दुसऱ्या पर्वात एका भारतीय जवानाची कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये जवान सिमेवर असताना त्याची पत्नी इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करताना दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या कथेमुळे समाजात भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरत असल्याचा आरोप प्रसिद्ध युट्युबर हिंदुस्तानी भाऊने केली होती. तसंच त्याने एकता विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.