‘सैराट’मधली ती विहीर हीच का?

‘याड लागलं’ गाण्यात परशा या विहिरीत बिनधास्त उडी मारताना दिसतो

Sairat movie, सैराट चित्रपट
चित्रपटात दाखविण्यात आलेली मुबलक पाणी असलेली विहीर आता पूर्णपणे कोरडी पडल्याचे या छायाचित्रात दिसून येते

‘सैराट’ चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपटातील परशा आणि आर्ची या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे, तर दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या दिग्दर्शन कौशल्याचेही कौतुक केले जात आहे. चित्रपट रिअलिस्टिक असावा, यासाठी नागराजने कोणताही सेट न उभारता एका अस्सल खेडेगावात संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. चित्रपटात एक विहीर सुद्धा दाखविण्यात आली आहे. चित्रपटाचा नायक परशा आणि नायिका आर्ची या विहिरीत मनसोक्त उड्या मारताना दिसतात. अजय-अतुलने संगीत दिलेल्या ‘याड लागलं’ गाण्यात परशा या विहिरीत बिनधास्त उडी मारताना दिसतो. या सीनने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, पण ज्या विहिरीवर हे चित्रीकरण करण्यात आले होते. त्या विहिरीच्या सद्यस्थितीचे भीषण वास्तव दाखवणारे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेली मुबलक पाणी असलेली विहीर आता पूर्णपणे कोरडी पडल्याचे या छायाचित्रात दिसून येते. कोरड्या पडलेल्या या विहीरीच्या छायाचित्राच्या माध्यमातून नेटिझन्स सोशल मीडियावर राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवर व्यक्त होत आहेत.
दरम्यान, कोरड्या विहिरीचे हे छायाचित्र चित्रपटातील दाखविण्यात आलेल्या विहिरीचेच आहे का? हे कळू शकलेले नसले तरी हे छायाचित्र राज्यातील दुष्काळाच्या वास्तवाचे चटके मात्र नक्कीच देऊन जाते.

चित्रपटात दाखविण्यात आलेली विहीर-

sairat_vihir

 

‘सैराट’मधल्या विहिरीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला सध्याच्या परिस्थितीचा फोटो- 

चित्रपटात दाखविण्यात आलेली मुबलक पाणी असलेली विहीर आता पूर्णपणे कोरडी पडल्याचे या छायाचित्रात दिसून येते

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Well in the sairat movie photo viral on social media

ताज्या बातम्या