रितेश देशमुखकडून तुला मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट कोणतं? जिनिलिया म्हणाली... | What is the special gift you received from Riteish deshmukh reveled by wife Genelia nrp 97 | Loksatta

रितेश देशमुखकडून तुला मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट कोणतं? जिनिलिया म्हणाली…

नुकतंच जिनिलियाने रितेश देशमुखने दिलेल्या खास भेटवस्तूचा खुलासा केला आहे.

रितेश देशमुखकडून तुला मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट कोणतं? जिनिलिया म्हणाली…

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून येते. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. जिनिलिया ही नेहमीच इन्स्टाग्रामवरुन विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच जिनिलियाने रितेश देशमुखने दिलेल्या खास भेटवस्तूचा खुलासा केला आहे.

जिनिलियाने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘Ask Me Anything’ सेशनद्वारे चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी तिला चाहत्यांनी विविध प्रश्न विचारले. जिनिलियानेही त्याची मनमोकळेपणाने उत्तर दिली आहेत. यावेळी जिनिलियाला रितेशबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला रितेश सरांकडून मिळालेली खास भेटवस्तू कोणती? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता.

जिनिलियाने शेअर केला विलासराव देशमुखांसोबतचा आवडता फोटो, कॅप्शन चर्चेत

त्यावर उत्तर देताना जिनिलियाने एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिची दोन्ही मुलं रियान आणि राहिल दिसत आहेत. हा फोटो एक फुटबॉल सामन्यादरम्यानचा आहे. यात ते दोघेही फार छान दिसत आहेत.

तर दुसरीकडे एका चाहत्याने तिला रितेशकडून तुला मिळालेली सर्वात आवडती भेटवस्तू कोणती? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर जिनिलियाने एका सुकलेल्या गुलाबाचा फोटो शेअर केला आहे. हे गुलाब तिला रितेशने दिले आहे. त्यामुळे ते तिच्यासाठी फार खास आहे.

“माझं ब्रेकअप झालं होतं अन् त्यावेळी…”, प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

दरम्यान ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी जिनिलियाचे वागणे रितेशला फार काही पटले नाही. त्याने स्वत:हून तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला मात्र जेनेलियाने त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले. परंतु पुढे जसजसे एकमेकांना त्यांचे स्वभाव कळत गेले तसे त्यांच्यातले प्रेम खुलले. २०१२ मध्ये ते लग्न बंधनाता अडकले. त्या दोघांना रियान आणि रेहाल अशी दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
De Dhakka 2 Teaser : “थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय”, ‘दे धक्का २’चा धमाकेदार टीझर पाहिलात का?, नव्या अभिनेत्रीची एण्ट्री

संबंधित बातम्या

“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘काश्मीर फाइल्स’ अप्रतिम सिनेमा, पण प्रोपगंडाच! राजकीय दबावामुळे इफ्फीत समावेश – नदाव लॅपिड
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
बहुचर्चित ‘अवतार २’ केरळमध्ये होणार नाही रिलीज; चित्रपटगृहाच्या मालकांचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण
विजय देवरकोंडा ईडीच्या रडारवर; ‘या’ चित्रपटाच्या व्यवहाराची चौकशी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
देशभरातील सर्व आधारकार्डची माहिती त्यांच्याकडे कशी पोहोचते?
मुंबई: थेट न्यायालयाच्या आवारातूनच सहा मोबाइलची चोरी; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार
तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडल्यानंतर अमृता धोंगडे ढसाढसा रडली, नेटकरी म्हणतात “एवढं बदनाम करुन…”
IND vs NZ: टोपी घालून क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतीय खेळाडूंवर माजी खेळाडूची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमच्यावेळी तर…’
विकी कौशलने पहिल्यांदाच मराठी कार्यक्रमात लावली हजेरी; फोटो व्हायरल