Video : “हॅलो, तुझे वय किती?” जिनिलिया म्हणते…

अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यावर फार मजेशीर कमेंट केल्या आहेत.

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून येते. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. जिनिलिया ही नेहमीच इन्स्टाग्रामवरुन विविध व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती मुलींच्या वयाबद्दलच्या प्रश्नावरुन रिल करताना दिसत आहे.

जिनिलियाने नुकतंच एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या रिलमध्ये सुरुवातीला एक व्यक्ती तिला ‘हॅलो’ असे म्हणतो. त्यानंतर तो विचारतो की “तुझे वय किती आहे?” यावर जिनिलिया म्हणते, ‘२२ वर्षे….’ त्यावर तो व्यक्ती म्हणतो…”२२ वर्षे, पाच वर्षांपूर्वीही तू २२ वर्षच वय सांगितले होतेस.” त्यावर जिनिलिया थोडी गोंधळते पण पटकन गमतीत म्हणते, “बघितलं, आम्ही मुली किती एखाद्या गोष्टींवर ठाम असतो” आणि त्यानंतर ती आजूबाजूला बघताना दिसते.

हेही वाचा : “रितेश रावांचं नाव घेते…”, जिनिलिया वहिनींचा मराठीत दमदार उखाणा

तिने हा व्हिडीओ शेअर करताना “मुली या मनाने नेहमी तरुण असतात,” असे हटके कॅप्शन दिले आहे. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यावर एक नेटकरी म्हणाला, “तू तर सदैव २१ वर्षांची राहशील, २२ पण नाही,” असे त्याने लिहिले आहे.

दरम्यान जिनिलियाने दिवाळीदरम्यान इन्स्टाग्रामवर एक रिलचा व्हिडीओ तयार केला होता. “तू एवढी सुंदर दिसतेस, तर तुला परी म्हणू की सुंदरा…,” असा प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहे. त्यावर ती “अरे ताई म्हण…ताई!” असे उत्तर देत जिनिलिया हसायला लागली. या व्हिडीओत जिनिलियाही फार क्यूट दिसत आहेत. यात तिचा नेहमी दिसणारा निरागस स्वभाव पाहायला मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यावर फार मजेशीर कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा : “अरे ताई म्हण…ताई”, जिनिलियाचा ‘तो’ भन्नाट व्हिडीओ व्हायरल

तर काही दिवसांपूर्वी जिनिलियाने तिचा मोठा मुलगा रियानसोबतचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला होता. यात जिनिलिया व्हिडीओच्या सुरुवातीला “Hii Guys, ही मी आहे आणि हा… तू कोण आहेस रे?” असा प्रश्न विचारताना दिसते. जिनिलियाचा हा प्रश्न पाहून रियान दोन सेकंद गोंधळात पडतो. त्यावेळी त्याचे हावभाव फार सुंदर दिसत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: What is your age riteish deshmukh wife genelia deshmukh share new reel video nrp

ताज्या बातम्या