काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने पती नागा चैतन्यला घटस्फोट दिला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर अनेकांनी समांथाला ट्रोल केले होते. आता समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटवर नागार्जुनने प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या नागार्जुन बंगरराजू या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दरम्यान त्याला मुलगा नागा चैतन्य आणि समांथा यांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘या सगळ्यात नागा चैतन्य किती शांत राहिला याचा मला अभिमान आहे. तो याविषयी एकही शब्द बोलला नाही. एक वडील म्हणून मला त्याची काळजी वाटत होती. पण त्याला माझी जास्त काळजी होती. त्याने मला विचारले देखील होते की बाबा तूम्ही ठीक आहात ना? त्यावर मी उत्तर देत उलट मी तुला हे विचारायला हवे’ असे नागार्जुन म्हणाला.
UP Election 2022: काँग्रेसचं तिकीट मिळालेली ‘बिकिनी गर्ल’ अर्चना गौतम आहे तरी कोण?

bjp leader ganesh naik campaign for his son sanjeev naik
गणेश नाईकांची पुत्र संजीव नाईकांसाठी मिरा-भाईंदर मध्ये मोर्चे बांधणी, जुन्या समर्थकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात

२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघे पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले.