काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने पती नागा चैतन्यला घटस्फोट दिला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर अनेकांनी समांथाला ट्रोल केले होते. आता समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटवर नागार्जुनने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या नागार्जुन बंगरराजू या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दरम्यान त्याला मुलगा नागा चैतन्य आणि समांथा यांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘या सगळ्यात नागा चैतन्य किती शांत राहिला याचा मला अभिमान आहे. तो याविषयी एकही शब्द बोलला नाही. एक वडील म्हणून मला त्याची काळजी वाटत होती. पण त्याला माझी जास्त काळजी होती. त्याने मला विचारले देखील होते की बाबा तूम्ही ठीक आहात ना? त्यावर मी उत्तर देत उलट मी तुला हे विचारायला हवे’ असे नागार्जुन म्हणाला.
UP Election 2022: काँग्रेसचं तिकीट मिळालेली ‘बिकिनी गर्ल’ अर्चना गौतम आहे तरी कोण?

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What nagarjuna said about son naga chaitanya samantha ruth prabhus separation avb
First published on: 15-01-2022 at 14:20 IST