बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची लाडकी नात नव्या नवेली नंदा ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. नव्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे नव्या सोशल मीडियावर चर्चेत असते. पण यावेळी नव्याची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत नव्या तिच्या घरात होणाऱ्या भेदभावाबद्दल बोलताना दिसते.

एचटीने दिलेल्या वृत्तानुसार, नव्याने गेल्यावर्षी ‘She The People’ला मुलाखत दिली होती. यावेळी नव्या म्हणाली, “माझ्या घरी देखील असं होतं. जर घरी पाहूणे आले तर आई मला नेहमी बोलते की हे घेऊन जा, ते घेऊन जा. मलाच होस्ट होऊन सगळ्यांचे स्वागत करावे लागत होते. तर दुसरीकडे माझ्या भावाला नाही तो पण तर ही काम करू शकत होता.”

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Video: UPSC Civil Services Rank 239 Holder Pavan Kumar Celebrates Victory
VIDEO: शाब्बास पोरा! शेतकऱ्याचा लेक झाला IAS; घरची परिस्थिती बिकट, झोपडीत राहून यूपीएससीत भरारी
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

आणखी वाचा : ‘यांना थोडा शिष्टाचार शिकवा…’ एअर हॉस्टेसच्या वागणुकीवर संतापली अभिनेत्री

आणखी वाचा : ‘विक्रम वेधा’तला सैफचा लूक पाहून करीना म्हणाली, “माझा पती आधीपेक्षा…”

नव्या पुढे म्हणाली, “मला वाटतं मोठ्या कुटुंबात राहतात तेव्हा पाहुणचार, घर चालवणं, पाहुण्यांची काळजी घेणं. या सगळ्याची जबाबदारी मुलींची असते आणि मी माझ्या घरात माझ्या भावावर किंवा घरातील इतर लहान मुलांवर अशी जबाबदारी दिल्याचे कधीच पाहिले नाही. मला वाटतं मग हळूहळू मुली आणि स्त्रियांना वाटतं की घर चालवणं आणि सगळ्या गोष्टी सांभाळणं ही त्यांची जबाबदारी आहे.

आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका

दरम्यान, नव्या नवेली नंदाने इतर स्टार किड्सप्रमाणे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले नाही. ती एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तर नव्या ‘आरा हेल्थ’ नावाचे ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्म चालवते. या द्वारे नव्या महिलांशी संबंधित प्रश्न सगळ्यांसमोर मांडते. नव्या महिलांसाठी ‘नवेली प्रोजेक्ट’ नावाचा एक कार्यक्रमही चालवते. त्यातही ती महिलांसाठी काम करते.