९० च्या दशकात गोविंदा आणि कादर खान या जोडीने त्याकाळात बरेच हीट चित्रपट दिले. ‘हम’, ‘आग’, ‘हत्या’पासून ‘कुली नं १’, ‘हीरो नं १, ‘हसिना मान जायेगी’पर्यंत कित्येक चित्रपट लोकानी डोक्यावर घेतले.त्यापैकीच एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘दुल्हे राजा’. या चित्रपटात गोविंदा, कादर खान, रवीना टंडन, मोहनिष बेहेल, जॉनी लिव्हर,सारखे कलाकार होते. नुकतंच या चित्रपटाच्या रिमेकचे आणि नेगेटिव्हचे हक्क शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेंमेंट’ने विकत घेतले असल्याची बातमी समोर आली आहे. गोविंदा आणि डेव्हिड धवन अभिनेता आणि दिग्दर्शक ही जोडी त्याकाळात प्रसिद्ध झाली होती. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना मात्र शाहरुख खान सोबत काम करायचे होते. मात्र गणित जुळून आले नाही.

नव्वदचं दशक संपत आले असताना बॉलिवूडमध्ये गोविंदाची घोडदौड सुरु होती. त्याने खान मंडळींना देखील मागे मागे टाकले होते. शाहरुखची प्रतिमा ‘रोमॅंटिक हिरो’ अशी झाली होती. डेव्हिड धवन यांनी त्यांच्या दिवाना मस्ताना चित्रपटातील बुन्नू या भूमिकेसाठी शाहरुख खानला विचारले होते. शाहरुख खानला भूमिका आवडली देखील मात्र शेवटच्या क्षणी त्याने नकार दिला होता. गोविंदाने ही भूमिका केली होती, अनिल कपूर, जॉनी लिव्हर आणि गोविंदा अशा त्रिकुटाने चित्रपट हिट करून दाखवला.

रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ‘या’ हिट चित्रपटाला मागे टाकले

पिंकव्हिलाच्या सूत्रांनुसार २००० च दशक सुरु झालं आणि डेव्हिड धवन यांनी पुन्हा एकदा शाहरुखशी एका नव्या चित्रपटटासंदर्भात संपर्क केला होता. मोरानीज निर्मित ‘किस किसको प्यार करू’ नावाच्या चित्रपटात त्या काळातील तब्बल सात आघाडीच्या अभिनेत्री आणि शाहरुख खान अशी कल्पना डेव्हिड धवन यांची होती. मात्र यावेळी दोघांना एकमेकांची काम करण्याची पद्धत पटली नसल्याने हा चित्रपट बनू शकला नाही. त्यानंतर हा चित्रपट कायमचा बंद झाला. अब्बास-मस्तान यांनी हेच शीर्षक घेऊन कपिल शर्मा अभिनीत चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

डेव्हिड धवन यांनी ‘जुडवा’, ‘कुली१’ या आपल्याच चित्रपटांचे रिमेक बनवले आहेत. डेव्हिड धवन अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांची दोन्ही मुलं देखील चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. शाहरूख खान देखील आगामी ‘पठाण’, ‘जवान’ या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात तो विशेष भूमिकेत दिसणार आहे अशी चर्चा आहे.