‘या’ कारणामुळे हेमा मालिनी यांनी राजेश खन्ना यांना महत्त्व दिले नाही

या दोन्ही कलाकारांनी आपल्या उमेदीच्या काळात ‘सुपरस्टार’ असणे म्हणजे काय ते अनुभवले आहे.

hema malini, hema malini biography, hema malini news, rajesh khanna, rajesh khanna news, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online,

बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणाऱ्या हेमा यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ७० ते ८० च्या दशकात हेमा मालिनी यांना तर ‘ड्रिम गर्ल’च म्हटले जायचे. तर त्यावेळी राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरुणी काहीही करण्यास तयार व्हायच्या. या दोन्ही कलाकारांनी आपल्या उमेदीच्या काळात ‘सुपरस्टार’ असणे म्हणजे काय ते अनुभवले आहे. पण राजेश खन्ना यांना हेमा मालिनी फार गर्विष्ठ वाटायच्या? हे तुम्हाला माहित आहे का?

हे तर साऱ्यांनाच माहित आहे की राजेश खन्ना नेहमीच सेटवर उशीरा जायचे. त्यांच्या या वागण्यामुळे दिग्दर्शकापासून ते सह-कलाकारांपर्यंत सारेच वैतागलेले असायचे. खन्ना यांच्या या सवयीमुळे हेमा मालिनीही त्रस्त असायच्या. या दोघांच्या ‘अंदाज’ या पहिल्या सिनेमावेळी राजेश खन्नांवर हेमा चांगल्याच चिडल्या होत्या.

‘मिड-डे’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी म्हणाल्या होत्या की, ”अंदाज’ सिनेमाच्या सेटवर राजेश खन्ना नेहमीच उशीरा यायचे. अनेकदा संपूर्ण टीम ८ ते १० तास त्यांची वाट पाहत ताटकळत बसायची. पण तरीही कोणाचीही त्यांना बोलायची हिंमत व्हायची नाही.’ यानंतर त्या म्हणाल्या की, खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी मुली वाट्टेल ते करायला तयार व्हायच्या. पण मी कधीच त्यांना सह-कलाकारापेक्षा जास्त महत्व दिलं नाही. सेटवर उशीरा येण्याच्या त्यांच्या सवयीचा मला राग यायचा. त्यामुळेच राजेश यांना मी गर्विष्ठ वाटत असावी. पण खरे पाहायला गेले तर ते स्वतःमध्येच अधिक रमायचे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: When hema malini told i did not give him any special attention to rajesh khanna avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या