“माझा अ‍ॅटिट्यूड आधीपासूनच खराब आहे…”, कंगणाने करणसोबतचा जुना व्हिडीओ केला शेअर

कंगनाने सोशल मीडियावर हा थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे.

kangna ranaut, karan johar,
कंगनाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. देशातल राजकारण असो किंवा बॉलिवूडचे मुद्दे, कंगना प्रत्येक बाबतीत आपले विचार अगदी स्पष्टपणे मांडत असते. दरम्यान, कंगनाचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

कंगना आणि दिग्दर्शक करण जोहरमध्ये असलेले वाद हे जगजाहीर आहे. कंगनाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कंगनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केला आहे. खरतरं हा थ्रोबॅक व्हिडीओ कंगनाच्या एका फॅनपेजने शेअर केला होता. हाच व्हिडीओ कंगनाने स्टोरीवर शेअर केला आहे. फिल्मफेअर अवॉर्डचा हा थ्रोबॅक व्हिडिओ कंगनाने शेअर केला आहे. ज्यामध्ये ती करणकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

या व्हिडीओत करण अवॉर्ड शोचे सुत्रसंचालन करत असल्याचे दिसत आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर, कंगना स्टेजवरून खाली उतरते. त्यावेळी करण कंगनाला आवाज देतो. मात्र, कंगना त्याकडे दुर्लक्ष करते आणि पुढे निघून जाते. हा व्हिडिओ शेअर करत “माझा अ‍ॅटिट्यूड आधीपासूनच खराब आहे.” तर दुसर्‍या पोस्टमध्ये म्हणाली, “हे माझे चित्रपटसृष्टीतील पहिले वर्ष आहे, मी तरूण होते पण अ‍ॅटिट्यूड असाच होता.”

आणखी वाचा : लॉस एंजलिसमध्ये प्रियांकाने निकसोबत केलं लक्ष्मी पूजन, फोटो व्हायरल

दरम्यान, कंगना लवकरच ‘धाकड’, ‘तेजस’ आणि ‘इमर्जन्सी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या शिवाय कंगना ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिड्डा’ आणि ‘सीता- द इन्कारनेशन’मध्येही काम करणार आहे. यासोबतच कंगना ‘टिकू वेड्स शेरू’ या आणखी एका चित्रपटाची निर्मिती करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: When kangna ranaut ignores karan johar in film fare award she share instagram stories dcp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या