लारा दत्ताला चित्रपटसृष्टीत येऊन २१ वर्षे झाली आहेत. मॉडेलिंगमध्ये यश मिळवल्यानंतर, अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. २००० मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर लारा दत्ताने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तिने तिची को-कंटेस्टंट आणि मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राबरोबर ‘अंदाज’ (२००३) चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

राज कंवर दिग्दर्शित ‘अंदाज’ या चित्रपटात अक्षय कुमारचीही मुख्य भूमिका होती. या चित्रपटात अक्षयची लारा आणि प्रियांकाबरोबरची जोडी हिट झाली. या चित्रपटात लाराने काजलची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एक गाणे, ‘रब्बा इश्क ना होवे’, हेदेखील खूप लोकप्रिय झाले. लोकांना हे गाणे खूप आवडले. पण, कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की, हे गाणे लाराच्या आयुष्याचे शत्रू बनले.

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लारा दत्ताबरोबर एक अपघात झाला. या गाण्याच्या चित्रीकरणामुळे लारा दत्ता मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावली. तेव्हा अक्षय कुमार होता, ज्याच्यामुळे लारा वाचली. लाराने स्वतः एका मुलाखतीत म्हटले आहे की, अक्षयने तिचा जीव वाचवला आहे. ती पाण्यात बुडण्यापासून थोडक्यात बचावली. ‘पिंकव्हिला’च्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमार आणि लारा दत्ता ‘रब्बा इश्क ना होवे’ या गाण्यासाठी शूटिंग करीत होते. हे गाणे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये चित्रित केले जात होते.

अक्षय कुमारने वाचवला लाराचा जीव

या गाण्याचे चित्रीकरण सुरू असताना समुद्रात भरती आली होती. लारा दत्ताचा तोल गेला, तिचा पाय घसरला आणि ती पडली. लारा दत्ताला त्यावेळी पोहता येत नव्हते. सुदैवाने अक्षय कुमारने लगेच समुद्रात उडी मारली आणि लाराला वाचवले. या घटनेनंतर लारा आणि अक्षय चांगले मित्र बनले.

‘अंदाज’नंतर अक्षय कुमार आणि लारा दत्ता यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पुन्हा एकदा अक्षय आणि लाराची जोडी पडद्यावर दिसणार आहे. ती अक्षयबरोबर ‘वेलकम टू द जंगल’मध्ये दिसणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाराने २०११ मध्ये टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केले. त्यांचे लग्न गोव्यात झाले. लाराच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर, तिने ‘मस्ती’, ‘नो एंट्री’, ‘भागम भाग’, ‘बिल्लू’, ‘हाऊसफुल’ व ‘डॉन २’सारखे व्यावसायिक चित्रपट दिले आहेत. २०१६ मध्ये ती ‘फितूर’मध्ये दिसली. त्यानंतर ती २०१८ मध्ये ‘वेलकम टू न्यू यॉर्क’मध्ये दिसली. त्यानंतर २०२१ मध्ये ती ‘बेल बॉटम’, ‘इश्क-ए-नादान’मध्ये दिसली.