बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हे नाव अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव आहे. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’या चित्रपटातून महिमाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. या पहिल्यावहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सिनेविश्वात तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. मात्र अचानक झालेल्या एका घटनेनंतर महिमाचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर महिमाने चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिमा चौधरी ही नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी महिमा चौधरीने एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीवर निशाणा साधला होता. यात तिने सिनेसृष्टीत कशाप्रकारे अभिनेत्रींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नकार दिला जातो, याबद्दल भाष्य केले होते. यावेळी महिमा म्हणाली, “मला असे वाटते की आता चित्रपटसृष्टी बऱ्यापैकी रुळावर आली आहे. आता अभिनेत्रींना योग्य भूमिका आणि चित्रपटात त्यांच्या योग्य सीन्स दिले जात आहेत. त्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदलाही मिळत आहे. तसेच त्यांच्याकडे पहिल्यापेक्षा जास्त चांगल्या ऑफर्स येत आहेत.”

आणखी वाचा : “त्या दोन महिन्यात माझी मुलगी…” स्तनाच्या कर्करोगाचा अनुभव सांगताना महिमा चौधरी झाली भावूक

“पण पूर्वी चित्रपटसृष्टीत ही स्थिती नव्हती. त्यावेळी सिनेसृष्टीही पुरुषप्रधान असायची. त्या काळात अभिनेत्रींच्या रिलेशनशिपचा परिणाम त्यांच्या कामावर व्हायचा. जर तुम्ही कुणाला तरी डेट करताय हे कळताच त्याबाबत चर्चा सुरु व्हायच्या. अनेकदा त्याबद्दल लिहिले जायचे. कारण व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच एखादी भूमिका करण्यास प्राधान्य दिले जायचे. यात अशा अभिनेत्रींनाही प्राधान्य असायचे ज्यांनी आजवर किस केलेले नाही.” असेही तिने सांगितले.

“तुमच्या रिलेशनशिपबद्दल त्यांना कळाले की ते लगेच त्याविषयी चर्चा करणार. अच्छा ती अमुक अमुकसोबत डेट करत आहे का? अशा चर्चा त्यावेळी रंगायच्या आणि जर तुमचे लग्न झाले असेल तर तुमचे करिअर संपलेच म्हणून समजा. तसेच जर तुम्हाला मुलं झालेली असतील तर ते पूर्णपणेच संपलेले असते. त्यामुळे त्याकाळी बॉलिवूडमध्ये काम करणे आणि वैवाहिक स्थिती याला फार महत्त्व होते.” असेही ती म्हणाली.

“पण आता अनेक गोष्टी बदलत असल्याचे महिमाने सांगितले आहे. आजकाल तुम्ही कुणाला डेट करता याचा तुमच्या कामावर परिणाम होत नाही. प्रोफेशनल लाइफ आणि प्रायवेट लाइफ दोन्ही वेगळे ठेवण्याचा प्रयत्न सर्वजण करत असल्याचे महिमाने सांगितले.” दरम्यान २०१६ पासून महिमा अभिनयापासून लांब झाली. २०१६ मधला ‘डार्क चॉकलेट’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. आता ती अनुपम यांच्या ‘द सिग्नेचर’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When mahima chaudhry talked about the film industry being male dominant wanted virgins in films nrp
First published on: 13-09-2022 at 09:44 IST