प्रिन्स चार्ल्स यांना ‘Kiss’ करणाऱ्या तुम्हीच का? लंडनमध्ये पद्मीनी कोल्हापूरे यांना विचारला होता प्रश्न

पद्मीनी यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

padmini kolhapure, prince charles,
पद्मीनी यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

अभिनेत्री पद्मीनी कोल्हापूरे यांचे आजही लाखो चाहते आहेत. पद्मीनी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कोणत्याही कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये त्यांच नाव आलेलं पद्मीनी यांना वाटतं नव्हतं. मात्र, ८० च्या दशकात एक अशी घटना घडली की संपूर्ण जगात पद्मीनी यांचं नाव कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये आलं होतं.

१९८० मध्ये प्रिन्स चार्ल्स यांनी भारत दौरा केला होता. त्यावेळी चित्रपटाचं चित्रीकरण पाहण्यासाठी सेटवर प्रिन्स चार्ल्स यांनी हजेरी लावली होती. दरम्यान त्यांचे स्वागत अभिनेत्री पद्मीनी कोल्हापूरे यांनी केले होते. तेव्हा त्यांनी स्वागत करताना प्रिन्स चार्ल्स यांना गालावर चुंबन केले होते. त्यावेळी प्रिन्स चार्ल्स आणि प्रिंसेस डायाना यांच लग्न देखील झालं नव्हतं. त्यामुळे पद्मीनी कोल्हापुरे आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या विषयी त्यावेळी जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या ४८ व्या वाढदिवसाच्या बर्थडेपार्टीतील फोटो व्हायरल

दरम्यान, पद्मीनी यांनी एकदा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली होती. यामुलाखतीत त्यांनी या संबंधीत एक किस्सा सांगितला, जेव्हा त्या लंडनला गेल्या होत्या, तेव्हा एका इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्यांना ओळखले आणि म्हणाला प्रिन्स चार्ल्स यांना चुंबन केलेली मुलगी तुच आहेल का? आणि हा प्रश्न ऐकल्यानंतर त्यांना लाजवाटली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: When padmini kolhapure was asked by british immigration officer are you the same person who kissed prince charles dcp

ताज्या बातम्या