रवीना टंडनने पार्टीत पतीच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला पाहिले अन्…

रवीनाने जे काही केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला…

raveena-tandon

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रवीना फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बेधडक वक्तव्यासाठी देखील ओळखली जाते. ती सोशल मीडिया पोस्टद्वारे सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. तिने ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. पण तुम्हाला माहिती आहे का एकदा रवीनाने पतीच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या अंगावर सरबत फेकले होते.

चित्रपटांमध्ये काम करत असताना रवीनाची ओळख उद्योगपती अनिल थडानीशी झाली. हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. त्यानंतर अनिलने रवीनाला लग्नासाठी विचारले होते. रवीनाने होकार देताच ते लग्न बंधनात अडकले. रवीना ही अनिलची दुसरी पत्नी. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव नताशा होते. एकदा चित्रपट निर्माताा रितेश सिधवानीच्या न्यू इअर पार्टीला रवीनाला बोलवण्यात आले होते. या पार्टीला अनिलची पहिली पत्नी नताशा देखील हजर होती.

या पार्टीमध्ये नताशा अनिलशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते. ते पाहून रवीनाला संतापली आणि तिच्या हातात असलेल्या ग्लासातील सरबत तिने नाताशाच्या चेहऱ्यावर फेकले. रवीनाचे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. या विषयी रवीनाला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते. “जर कोणी तिच्या पतीचा किंवा कुटुंबाचा अपमान करेल तर ती त्याला सोडणार नाही” असे रवीना म्हणाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: When raveena tondon felt insecure with husband anil thadani ex wife avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या