scorecardresearch

Premium

“ज्या चित्रपटात धोतर नेसावं लागेल…” ऋषी कपूर यांनी रणबीरला दिला होता सल्ला

ऋषी कपूर यांनी मुलगा रणबीर कपूरला खास सल्ला दिला होता.

rishi kapoor, ranbir kapoor, rishi kapoor son, ranbir kapoor film, shamshera, shahshera release date, vani kapoor, ऋषी कपूर, रणबीर कपूर, ऋषी कपूर मुलगा, शमशेरा, वाणी कपूर, शमशेरा प्रदर्शन तारीख, रणबीर कपूर चित्रपट
रणबीर लवकरच 'शमशेरा' चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला त्याचे वडील ऋषी कपूर यांनी अभिनय क्षेत्रात येण्याआधी बरेच महत्त्वाचे सल्ले दिले होते. यातील एक सल्ला असाही होता की, रणबीरनं पिरियड ड्रामा चित्रपट करू नये. त्यांनी रणबीरला कायम व्यावसायिक चित्रपट करण्याचा सल्ला दिला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरनं वडिलांनी दिलेल्या सल्ल्यांबाबत सांगितलं. रणबीर लवकरच ‘शमशेरा’ चित्रपटात दिसणार आहे. हा एक अॅक्शन पिरियड ड्रामा चित्रपट आहे.

रणबीर कपूरला एका मुलाखतीत ‘१५ वर्षांच्या करिअरमध्ये पिरियड ड्रामा चित्रपटापासू दूर का राहिलास?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला होता की असे चित्रपट कधीच करू नको ज्यात तुला धोतर नेसावं लागेल. कारण असे चित्रपट फारसे चालत नाहीत. त्यामुळे नेहमीच व्यावसायिक चित्रपटात काम कर. याशिवाय जेव्हा अशा चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तुम्हाला टाइपकास्ट केलं जातं आणि एक सारख्या चित्रपटांच्या ऑफर येतात. त्यामुळे तुम्ही नेहमीच तुमच्या कामात नवे प्रयोग करायला हवेत. मी मागच्या १५ वर्षांपासून प्रत्येक भूमिकेत नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर मिळाली मी लगेच होकार दिला.”

marathi actor prasad oak
“आज अचानक पॅकअप नंतर…” प्रसाद ओक याला चाहत्यांनी दिला आश्चर्याचा धक्का, अनुभव सांगत म्हणाला…
anil-sharma-naseeruddin-shah
जेव्हा ‘गदर २’च्या दिग्दर्शकाने बिकिनी परिधान करण्यास सांगितल्यावर नसीरुद्दीन शाह म्हणाले…
why anurag kashyap dont work with salman khan shahrukh khan
अनुराग कश्यप सलमान-शाहरुख खानबरोबर का काम करत नाही? खुलासा करत म्हणाला, “त्यांचे चित्रपट फ्लॉप…”
akshay-kumar-jawan
‘जवान’चं कलेक्शन शेअर करत खिलाडी कुमारने केलं किंग खानचं अभिनंदन; ट्वीट करत म्हणाला…

आणखी वाचा- “आम्ही विमानातच रोमँटिक…” आलियाने सांगितला रणबीरसोबतचा ‘तो’ किस्सा

आपल्या आणखी एका मुलाखतीत आपल्या चित्रपटाबाबत बोलताना रणबीर म्हणाला, “जर तुम्ही रामायण आणि महाभारतापासूनच्या ते थॉरपर्यंतच्या सर्वच कथा पाहिल्या तर हिरोची व्याख्या काय असते हे लक्षात येईल हिरो एक अशी व्यक्ती असते ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. ज्याच्यावर तुम्ही अवलंबून राहू शकता आणि तो तुम्हाला प्रेरित करतो. करण मल्होत्रा दिग्दर्शित ‘शमशेरा’ हा एक चित्रपट आहे ज्यात अशा डाकूंची कथा आहे जे इंग्रजांपासून स्वतःला स्वतंत्र करण्यासाठी लढा देत आहेत.” या चित्रपटात रणबीरनं वडील आणि मुलगा अशा दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. तर संजय दत्त भ्रष्ट पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २२ जुलैला प्रदर्शित होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When rishi kapoor suggest to son ranbir to do not sign the film that needs to wear a dhoti mrj

First published on: 12-07-2022 at 20:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×