scorecardresearch

मला वयाच्या ६० वर्षापर्यंत केबीसी होस्ट करायला आवडेल : शाहरुख खान

एकदा ‘कौन बनेगा करोडपती’ हा अभिनेता शाहरुख खान याने होस्ट केला होता. त्यावेळी त्याने “मला वयाच्या ६० वर्षापर्यंत हा शो करायला आवडेल,” असे सांगितले होते.

मला वयाच्या ६० वर्षापर्यंत केबीसी होस्ट करायला आवडेल : शाहरुख खान

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC). छोट्या पडद्यावर प्रसिद्ध होणार हा शो घराघरात प्रसिद्ध आहे. बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन सध्या केबीसीचा १३ वा सीझन होस्ट करताना दिसत आहेत. मात्र एकदा ‘कौन बनेगा करोडपती’ हा अभिनेता शाहरुख खान याने होस्ट केला होता. त्यावेळी त्याने “मला वयाच्या ६० वर्षापर्यंत हा शो करायला आवडेल,” असे सांगितले होते.

अमिताभ बच्चन हे २००० पासून केबीसीचा शो होस्ट करतात. मात्र त्यांनी केबीसीचे दोन सिझन होस्ट केल्यानतंर हा शो सोडला होता. त्यानंतर तिसऱ्या सिझनसाठी शो होस्ट करण्याचा प्रस्ताव नाकारला होता. त्यामुळे या शो च्या निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांच्या जागी शाहरुख खानची होस्ट म्हणून निवड केली होती. शाहरुखने केबीसीचा केवळ एक शो होस्ट केला. त्यानंतर मात्र अमिताभ बच्चन यांनी चौथ्या सिझनपासून पुन्हा हा शो होस्ट करण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by SRK VIBE (@srkvibe)

‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये २००७ मध्ये शाहरुखने हजेरी लावली. त्यावेळी रॅपिड फायर राऊंडमध्ये त्याला केबीसीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी करणने शाहरुखला तुला केबीसी होस्टच्या रुपात कोणाला बघायला आवडेल? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी शाहरुख म्हणाला, “मला माहिती नाही, या अगोदर केबीसीचे जे होस्ट होते, ते ६० वर्षांचे होते. त्यामुळे त्यांनी तो शो करण्यास नकार दिला होता. त्यामुळे मी जोपर्यंत ६० वर्षांचा होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी इतर कोणालाही पाहू शकत नाही,” असे त्याने सांगितले.

सध्या केबीसीचा १३ वा सीझन सुरु आहे. दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर हा शो प्रसारित केला जातो. त्यासोबतच SonyLiv आणि JioTV या ठिकाणीही प्रेक्षकांना हा शो ऑनलाईन पाहता येतो.‘कौन बनेगा करोडपती १३’च्या शानदार शुक्रवार या खास भागात दर आठवड्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. स्पर्धाकांप्रमाणेच बिग बी अमिताभ बच्चन या सेलिब्रिटींसोबत धमाल करताना दिसतात.

 

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या