वजन कमी करण्यावरुन शाहरुख खानने मारलेला अंबानींच्या मुलाला टोमणा; अनंत अंबानीने दिलं ‘हे’ उत्तर

काही वर्षांपूर्वी अनंत अंबानीने १८ महिन्यात १०८ किलो वजन घटवले होते.

anant ambani

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हे दोघे सध्या चर्चेत आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा नुकताच पार पडला. अंबानींच्या मुंबईतील अँटेलिया निवासस्थानी अगदी राजेशाही थाटात हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. खुद्द शाहरुख खाननेही सहकुटुंब सहपरिवार हजेरी लावली होती.

साखरपुड्याचे फोटोज पाहून अनंत अंबानीला त्याच्या वाढलेल्या वजनावरुन प्रचंड ट्रोल केलं जात आहे, पण काही वर्षांपूर्वी त्याने त्याचं वजन कमी केल्यामुळेही तो चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी अनंत अंबानीने १८ महिन्यात १०८ किलो वजन घटवले होते. तेव्हा बॉलिवूडच्या किंग खानने एका कार्यक्रमात अनंत अंबानीची खिल्ली उडवली होती आणि अनंतने सुद्धा शाहरुखला त्याच्याच शैलीत याचं उत्तरही दिलं होतं.

आणखी वाचा : “त्याला केवळ २ तास…” कियारा अडवाणीने केलेला सुशांत सिंह राजपूतच्या ‘त्या’ सवयीबद्दल खुलासा

२०१७ मध्ये अंबानी कुटुंबाने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४० वर्षांच्या पूर्ण होण्याच्या निमित्ताने आणि धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शाहरुख खानलाही आमंत्रित करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात शाहरुखने अनंत अंबानीच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल कौतुक केलं होतं. त्याचं कौतुक करताना शाहरुख म्हणाला, “तू केलेलं हे ट्रान्सफॉर्मेश खूप प्रेरणादायी आहे. पण तू हे नेमकं ठरवून केलंस का?” यावर अनंत अंबानी म्हणाला, “मी तर हे फक्त माझं आरोग्य सुधारावं आणि आयुष्य सुरळीत व्हाव यासाठी केलं.”

हेही वाचा : अनंत-राधिकाच्या साखरपुड्यात ‘वाह वाह रामजी’वर थिरकले मुकेश अंबानी व नीता अंबानी; व्हिडीओ व्हायरल

शाहरुख यावर अनंतची मस्करी करत म्हणाला, “तुझ्या या कृतीमुळे जियोला खूप त्रास होतोय, मलासुद्धा याचा त्रास होतोय. कारण जियोचा डेटा पॅक आणि माझे सिक्स पॅक तुझ्या पॅकसमोर अगदी नगण्य दिसू लागले आहेत.” यावर अनंत अंबानीनेसुद्धा शाहरुखला प्रत्युत्तर दिलं. अनंत अंबानी म्हणाला, “तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या क्षेत्रात येणार नाही, मी आहे तिथे खूप खुश आहे.” अनंतचं हे उत्तर ऐकून शाहरुखही काही क्षण निशब्द झाला, नंतर संपूर्ण कार्यक्रमात एकच हशा पिकला. शाहरुख खान ‘पठाण’ या चित्रपटातून ४ वर्षांनी पुनरागमन करण्यास सज्ज आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 10:40 IST
Next Story
Video: “भारतीय चित्रपटांचा आदर करा” जावेद अख्तर यांचं वक्तव्य, हॉलिवूडशी तुलना करत म्हणाले, “जगभरातील…”
Exit mobile version