अभिनेता शाहरुख खान आणि हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोली यांनी २००० साली इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड (iifa) सोहळ्यात एकत्र हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. शाहरुख खाननं यावेळी पुरस्काराची घोषणा करताना दिग्दर्शक संजय लीला भन्साळींची खिल्ली उडवली होती. त्यावेळी एंजेलिना जोलीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुख स्टेजवर आल्यानंतर प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहे. तो म्हणतो, “सर्वांना शुभ संध्याकाळ, खरं तर हे खूप भारी आहे कारण मी एंजेलिनासोबत या मंचावर आहे. ती तुम्हाला काही सांगू इच्छिते.” शाहरुखनंतर एंजेलिना बोलताना दिसते. ती म्हणते, “भारतीयांना माझा नमस्कार, मला इथे निमंत्रित केल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. ही आनंदाची गोष्ट आहे.”

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
usha mehta congress radio
ब्रिटिशांना आपल्या आवाजाने ‘सळो की पळो’ करून सोडणार्‍या उषा मेहतांची कहाणी
sanket korlekar sister uma debut on star pravah new serial sadhi mansa
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकली प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण; फोटो शेअर करत म्हणाला, “तू पहिल्यांदा टीव्हीवर…”

आणखी वाचा- करण जोहरच्या वाढदिवसाची पार्टी ठरली सुपर- स्प्रेडर? तब्बल ५५ जणांना करोनाची लागण

या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख आणि एंजेलिना यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराची घोषणा केली होती. हा पुरस्कार त्यावेळी ‘हम दिल दे चुके सनम’ (१९९९) या चित्रपटासाठी ऐश्वर्या रायला देण्यात आला होता. मात्र पुरस्कार घेण्यासाठी ऐश्वर्या राय काही कारणानं या सोहळ्याला उपस्थित राहू शकली नव्हती. त्यामुळे तिच्यावतीने हा पुरस्कार दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी स्वीकारला होता.

आणखी वाचा- “हे तर बेकायदेशीर आहे…” संस्कृती बालगुडेच्या फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत

संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्याच्या वतीने मंचावर येत हा पुरस्कार स्विकारल्यानंतर शाहरुखनं त्यांची खिल्ली उडवली होती. भन्साळी यांची मस्करी करताना शाहरुख म्हणाला, “आम्हाला हे कन्फर्म करावं लागेल जेणेकरून एंजेलिनाला समजेल की मंचावरील व्यक्ती ऐश्वर्या राय नाही.” यावर एंजेलिना जोरजोरात हसू लागली. आपलं वाक्य पूर्ण करत शाहरुख पुढे म्हणाला, “हे चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आहेत. ऐश्वर्याच्यावतीने ते पुरस्कार घेण्यासाठी आले आहे.” दरम्यान हा पुरस्कार सोहळ्या २४ जून २००० साली लंडनच्या मिलेनियम डोममध्ये पार पडला होता.