तेलुगू चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी गेल्यावर्षी ‘आरआरआर’सारखा सुपरहीट चित्रपट दिला. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आरआरआर’ यावर्षीचा सर्वात जास्त गाजलेला आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.

‘Reddit.com’ या वेबसाईटवर एसएस राजामौली यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तेलुगू सुपरस्टार प्रभासच्या २००८ च्या ‘बिल्ला’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचदरम्यानचा आहे. या सोहळ्याला एसएस राजामौली यांनी हजेरी लावली आणि तेव्हा बोलताना त्यांनी बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि प्रभास यांची तुलना केली. हा व्हिडिओ चांगलाच गाजतोय.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

आणखी वाचा : सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री यांना धमक्यांचे मेसेज; शाहरुख खानचं नाव घेत केलं दिग्दर्शकाने ट्वीट

या व्हिडिओमध्ये राजामौली जे म्हणाले आहेत त्याचा थोडाफार अर्थ असा होतो की, “जेव्हा २ वर्षांपूर्वी धूम २ प्रदर्शित झाला, मला आश्चर्य वाटलं की आपण बॉलिवूडसारखे चित्रपट का बनवू शकत नाही. आपल्याकडे हृतिक रोशनसारखे हीरो नाहीत का? मी नुकतंच ‘बिल्ला’ची गाणी आणि पोस्टर पहिलं आहे, यावर मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की प्रभाससमोर हृतिक रोशन काहीच नाहीये. यासाठी मी दिग्दर्शक मेहेर रमेश यांचे आभार मानेन.”

राजामौली यांच्या या वक्तव्यावरून सध्या चर्चा सुरू आहे. राजामौली जे म्हणाले आहेत त्याचं हे तंतोतंत भाषांतर नसल्याचं काही लोकांनी व्हिडिओखाली कॉमेंटमध्ये सांगितलं आहे. शिवाय हा व्हिडिओ तब्बल १५ वर्षांपूर्वीचा असून तेव्हा तेलुगू चित्रपटांकडे कुणीच एवढं बारकाईने बघत नसल्याचं एका युझरने लिहिलं आहे. काहींचं म्हणणं आहे की राजामौली, यांना “हृतिक असं काम करू शकणार नाही.” असं म्हणायचं आहे.

या व्हिडिओमुळे राजामौली यांच्या लोकप्रियतेत काहीच फरक पडणार नाही, पण सोशल मीडियावर ही चर्चा वेगळं वळण घेऊ शकते. २००९ सालचा ‘बिल्ला’ हा अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटामुळे प्रभासला चांगलीच लोकप्रियता मिळाली. यामध्ये प्रभासबरोबर अनुष्का शेट्टीसुद्धा मुख्य भूमिकेत होती.