मराठी भाषा आज जगभरात पोहचली आहे. आज अनेक मराठी माणसं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहेत. माणसांच्या निमित्ताने मराठी भाषाचे ओळखदेखील जगाला झाली आहे. आज अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये महाराष्ट्र मंडळ आहेत. जिथे मराठी भाषेची संस्कृती जपली जाते. याच मराठी भाषेचा गोडवा बॉलिवूडच्या कलाकारांना परदेशी नागरिकांना लागला आहे. टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉल यानेदेखील मराठी भाषेत संवाद साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किली पॉलचा गायक राहुल वैद्य बरोबरचा मराठीत संवाद साधल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली. तेव्हा राहुल वैद्यने त्याला मराठीत दोन शब्द बोलायला लावले. ज्यात किली म्हणाला ‘माझं नाव किली आहे, मी केनियावरून आलो आहे’, आणि शेवटी तो जय महाराष्ट्र म्हणाला आहे. राहुल वैद्यने आधी म्हणून दाखवले मग किलीने त्याच्या पाठोपाठ मराठीत म्हंटले, त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हारायल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओच कौतुकदेखील केलं आहे.

“हो मी त्याच्यासाठी… ” जेव्हा करीना कपूरने सैफ अली खानबद्दल केला होता खुलासा

किली पॉल कोण आहे?

किली पॉल त्याची बहीण नीमा पॉल दोघे इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहेत. किलीच्या इन्स्टाग्रामवर ३६ लाखांच्यावर फॉलोअर्स आहेत. भारतात ते लोकप्रिय आहेत. ते बॉलिवूडच्या गाण्यांवर रील्स बनवतात. त्याला चांगली प्रसिद्धी मिळते. मध्यंतरी स्टार किली पॉलवर चाकूने हल्ला करण्यात आला होता ज्यात तो गंभीर जखमी झाला होता.

किली पॉलचा गौरव

टांझानियातील भारतीय उच्चायुक्त बिनिया प्रधान यांनी त्याचा सत्कार केला होता. भारतीय दूतावासात किलीला बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला होता. बिनिया प्रधान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटनवरून ही माहिती दिली होती. भारतीय उच्चायुक्तांचे खूप खूप आभार’ असं म्हणत किलीनंही सोशल मीडियावरून भारतीय उच्चायुक्तांचे आभार मानले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When tanzania social media star kili paul speaking in marathi spg
First published on: 01-10-2022 at 10:09 IST