१५ जून पासून सुरु होणार मालिकांचे चित्रीकरण?

अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे..

लवकरच छोट्या पडद्यावरील मालिकांचे चित्रीकरण सुरु होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनमुळे मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण आता महाराष्ट्र सरकारने दिलेल्या परवानगीमुळे मालिकांचे चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे. पण यासाठी सरकारने काही नियम आखले आहेत. त्यामुळे निर्मात्यांसमोर मोठे आव्हान आहे. आता कुमकुम भाग्य, कुंडली भाग्य, तुझसे है राब्ता आणि गुड्डन या मालिकांचे १० जून पासून चित्रीकरण सुरु होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

कुमकुम भाग्य मालिकेतील अभि-प्रज्ञाच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुग्धा चाफेकरने नुकताच ‘आजतक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मालिकांचे चित्रीकरण केव्हा सुरु होणार याबाबत वक्तव्य केले आहे. ‘आम्ही लवकरच मालिकांचे चित्रीकरण सुरु होण्याची आशा करतो. पण इतक्या लवकर चित्रीकरण सुरु होईल असे मला वाटत नाही’ असे ती म्हणाली.

‘आज नाही तर उद्या छोट्या पडद्यावरील मालिकांचे चित्रीकरण सुरु होणारच आहे. त्यामुळे सर्व कलाकार स्वत:ची मानसिकदृष्ट्या तयारी करत आहेत. स्टारप्लस वाहिनीवरील ये रिश्ता क्या कहलाता है आणि ये रिश्ते है प्यार के या मालिकांचे निर्माते राजन शाही यांनी लवकरच मालिकांचे चित्रीकरण सुरु करणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच कलर्स वाहिनीवरील शुभारम्भ, नाटी पिंकी आणि छोटी सरदारनी चे चित्रीकरण १५ जून नंतर सुरु होण्याची शक्यता आहे’ असे तिने पुढे म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: When tv shows to star shooting avb