अभिनेत्री कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर कॉफी विथ करण सीझन ७ च्या नव्या भागात दिसणार आहेत. कबीर सिंग चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. हीच जोडी कॉफ कॉफी विथ करण कार्य्रक्रमात पुन्हा एकदा धमाल करताना दिसत आहेत. याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी कबीर सिंग चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे किस्से सांगितले आहेत. कियाराने शाहिदबद्दल खटकलेली गोष्ट यात सांगितली आहे.

शाहिदने ‘कबीर सिंग’ चित्रपटाच्या सेटवर कियाराला ८ तास वाट बघायला लावली होती. किआराने याबाबत सांगितले की, ‘चित्रीकरणाचा माझा तिसरा किंवा चौथा दिवस होता आणि पुढच्या सीनसाठी शाहिद कोणते शूज घालणार यावर चर्चा होत असल्याने मला आठ तास वाट पाहण्यास सांगण्यात आले’. यासाठी मला शाहिदच्या कानशिलात द्यावीशी वाटत होती. करणने हा किस्सा ऐकताच तो देखील म्हणाला, ‘मी तुझ्या जागी असतो तर मी देखील हेच केलं असतं’. या प्रकरणावर काय शाहिद म्हणाला आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण भाग बघावा लागेल. गुरुवारी रात्री १२ वाजता डिस्ने हॉटस्टारवर हा भाग प्रदर्शित होणार आहे.

या कार्यक्रमात करण बॉलिवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारतो. सध्याच्या या नवीन सीझनमध्ये आलिया भट, जान्हवी कपूर, सारा अली खान, अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा अशा स्टार्सनी हजेरी लावली. एकंदरच हा कार्यक्रम स्टार्सच्या वादग्रस्त विधानांसाठी फार लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात सगळेच स्टार एकमेकांची गुपितं अगदी बिनधास्त उघड करत असतात.