दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा उल्लेख आवर्जुन केला जातो. या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. मात्र आता हा चित्रपट एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. इफ्फीचे ज्युरी हेड नदाव लॅपिड यांनी केलेल्या विधानामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. यानंतर नदाव लॅपिड नक्की कोण असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) या चित्रपटाचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा वाद निर्माण झाला आहे. गोव्यात आयोजित ५३ व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना नदाव लॅपिड यांनी हा चित्रपट ‘वल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ असल्याचं जाहीरपणे सांगितलं. यानंतर बॉलिवूडमधून प्रतिक्रिया उमटत आहेत.
आणखी वाचा : IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला म्हटलं ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’; अनुपम खेर यांनी दिलं उत्तर, म्हणाले “असत्याची…”

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

इफ्फीचे ज्युरी हेड नेमकं काय म्हणाले?

गोव्यातील पणजी येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात इस्त्रायलच्या चित्रपट दिग्दर्शकाने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर जोरदार टीका केली. “काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त आहोत. हा चित्रपट आम्हाला घाणेरडा तसंच प्रचार करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेची आहे” असं ते म्हणाले.

नदाव लॅपिड नक्की कोण?

नदाव लॅपिड यांचा जन्म १९७५ रोजी इस्राईलच्या तेल अवीव या ठिकाणी झाला. नदाव लॅपिड हे पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी तेल अवीव विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी घेतली. नदाव लॅपिड यांनी काही काळ लष्करामध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर जेरुसलेममधील सॅम स्पीगल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलमध्ये पदवी घेण्यासाठी ते इस्राइलला परतले.

त्यांना ‘सिनोनिम्स’ (२०१९) या चित्रपटामुळे ओळखले जाते. त्याशिवाय त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द किंडरगार्टन टीचर’ (२०१९), ‘पोलिसमॅन’ (२०११) या चित्रपटांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. या दोन्हीही चित्रपटांसाठी त्यांना गोल्डन बेअर आणि कान्स ज्युरी पारितोषिकही मिळाले. २००५ मधील रोड या शॉर्ट फिल्मची निर्मिती देखील त्यांनी केली. यापूर्वी लॅपिड हे २०१५ मध्ये झालेल्या लॉरकॅनो फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन लेपर्ड ज्युरी मेंबर होते.

आणखी वाचा : “भाजपा सरकारच्या नाकाखाली त्याने सात लाख हिंदू काश्मिरी पंडितांचा…”; “काश्मीर फाइल्स अश्लील” टीकेवरुन दिग्दर्शकाचा संताप

तसेच २०१६ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही त्यांनी आंतरराष्ट्रीय ज्युरी म्हणून काम पाहिले. तर २०२१ मध्ये झालेल्या ७१ व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल महोत्सवातही त्यांनी ऑफिशियल कॉम्पिटिशन ज्युरीची भूमिका पार पाडली होती.

नदाव लॅपिड हे ४७ वर्षांचे आहेत. मात्र कायमच ते त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नदाव लॅपिड यांनी त्यांच्या ‘सिनोनिम्स’ चित्रपटाबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्या ते म्हणाले होते की, इस्राइलमधील बहुतेक लोकांनी आपले आत्मे विकले आहेत, ते ‘सिक सोल’ झाले आहेत. त्यांच्या या विधानानंतरही वाद निर्माण झाला होता.