Who is Sobhita Dhulipala: अभिनेत्री सोभिता धुलीपाला व नागा चैतन्य यांचा साखरपुडा झाला आहे. समांथा रूथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यावर तीन वर्षांनी नागा चैतन्य पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. नागा चैतन्य व सोभिता यांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत्या, पण दोघांनी थेट साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. या साखरपुड्याचे फोटो नागा चैतन्यचे वडील अभिनेते नागार्जुन अक्किनेनी यांनी शेअर केले. साखरपुड्यानंतर सोभिता धुलीपाला खूप चर्चेत आहे. याच निमित्ताने तिच्याबद्दल जाणून घेऊयात. हिंदी व तेलुगू चित्रपटांमध्ये सोभिताने काम केलं आहे. तिने 'द नाइट मॅनेजर' व 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. याचबरोबर तिने देव पटेलच्या ॲक्शन थ्रिलर 'मंकी मॅन'मध्ये अभिनय करून हॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. दाक्षिणात्य चित्रपट, हिंदी चित्रपट, वेब सीरिज व हॉलीवूड सिनेमात काम करून सोभिताने तिच्या अभिनय प्रतिभा सिद्ध केली आहे. नागा चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलीपालाशी केला साखरपुडा, नागार्जुन यांनी फोटो केले शेअर सोभिताचा जन्म व शिक्षण ३१ मे १९९२ रोजी आंध्र प्रदेशमधील तेनाली येथे जन्मलेली सोभिता विशाखापट्टणममध्ये मोठी झाली. तिचे वडील वेणुगोपाल राव मर्चंट नेव्हीमध्ये इंजिनिअर होते, तर तिची आई संथा कामाक्षी या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. नंतर ती उच्च शिक्षणासाठी मुंबईला आली. तिने कॉर्पोरेट लॉ शिकण्यासाठी येथील एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी बांधली लग्नगाठ; अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केले लाडक्या लेकीचे Photos सोभिताचे बॉलीवूड पदार्पण सोभिता २०१० मध्ये वार्षिक नेव्ही बॉलमध्ये नेव्ही क्वीन ठरली होती. त्यानंतर ती फेमिना मिस इंडिया २०१३ स्पर्धेत फेमिना मिस इंडिया अर्थ ठरली होती. तिने २०१६ मध्ये अनुराग कश्यपच्या 'रमन राघव 2.0'मधून अभिनयात पदार्पण केले. तिने विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात स्मृतीका नायडू नावाचे पात्र साकारले होते. नागा चैतन्य व सोभिता धुलीपाला यांचे साखरपुड्याचे फोटो (फोटो- नागार्जुन यांच्या एक्स हँडलवरून साभार) सोभिता धुलीपालाचे चित्रपट व सीरिज पदार्पणानंतर सोभिता अक्षत वर्मा दिग्दर्शित 'कालाकांडी'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. राजा मेननचा 'शेफ' आणि अदिवी शेषचा तेलुगू चित्रपट 'गुडाचारी'तून तिला खूप लोकप्रियता मिळाली. २०१९ मध्ये 'मेड इन हेवन' या प्राइम व्हिडीओ वेब सीरिज तिच्या करिअरला कलाटणी देणारी ठरली. यात तिने तारा खन्ना ही भूमिका केली होती. जी वेडिंग प्लॅनर आहे. ही सीरिज हिट झाली व सोभिताच्या करिअरला गती मिळाली. वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos सोभिताने नेटफ्लिक्सवरील स्पाय थ्रिलर 'बार्ड ऑफ ब्लड', मल्याळम चित्रपट 'मूथॉन', इमरान हाश्मीसह हिंदी चित्रपट 'द बॉडी' आणि 'घोस्ट स्टोरीज' मध्ये काम केलं. याचबरोबर ती अनिल कपूर व आदित्य रॉय कपूर यांच्याबरोबर 'द नाईट मॅनेजर'च्या दोन सीझनमध्ये झळकली. ती 'पोन्नियन सेल्वन' चित्रपटातील दोन्ही भागात होती.