Taapsee Pannu Favourite Politician : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने मिश्किलपणे केलेल्या एका राजकीय वक्तव्यावरून आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. टीव्ही ९ भातवर्षने घेतलेल्या मुलाखतीतील हा एक भाग असून तिच्या मुलाखतीचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तुमचा आवडता राजकारणी कोण? या रॅपिड फायर प्रश्नावर तिला दोन पर्याय देण्यात आले होते. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी. या दोघांपैकी तिने एकाची निवड केली आणि अगदीच मिश्लिकपणे तिने नंतर एक विनोदी वक्तव्यही केलं. त्यामुळे ती आता प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे.
विविधांगी चित्रपट आणि त्यातील भूमिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणारी तापसी पन्नू सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने खुमासदार पद्धतीने केलेल्या एका राजकीय विधानाची सध्या चर्चा आहे. टीव्ही ९ भारतवर्षमध्ये तिची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात तिच्याबरोबर रॅपिड फायर प्रश्नांचा राऊंड घेण्यात आला. यामध्ये तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यातच, एक राजकीय प्रश्नही विचारण्यात आला.
तापसी पन्नूचा आवडता राजकीय नेता कोण?
तुमचा आवडता राजकीय नेता कोण? असं तिला विचारण्यात आलं. त्यावर दोन पर्याय देण्यात आले होते. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचा पर्याय तिच्यासमोर देण्यात आला.त्यात तिने नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र असलेल्या ठिकाणी दिशानिर्देश केलं आणि त्यांच्या हात जोडून त्यांच्या पाया पडली. त्यानंतर, पुढे येत तिने म्हटलं की, “मला अजूनही भारतात राहायचं आहे.” तिच्या या वक्तव्यानंतर स्टुडिओमध्येही जोरदार हशा पिकला.
तिचा हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या विनोदी बुद्धीचातुर्याचं कौतुक केलं जातंय. तापसी आतापर्यंत कोणत्याच राजकीय वादविवादात पडली नव्हती. परंतु, तिचं हे वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, तापसी पन्नूचा एक नवा चित्रपट आला आहे. अस्सी या चित्रपटात तिने पुन्हा एकदा वेगळी भूमिका साकारली आहे. स्त्री दाक्षिण्य किंवा सामाजिक धाटणीचे चित्रपट करण्यास तापसी पन्नू प्राधान्य देते. हा चित्रपटही त्याच धाटणीचा आहे.

