Trisha Krishnan Educational Background and Career Journey : तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन सध्या चर्चेत आहे. त्यामागचं कारण म्हणजे तिची आणि विजय थलपती यांची मैत्री. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजयने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर त्रिशा त्याला भेटण्यासाठी गेल्याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला.
त्रिशा व विजय यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अनेकांना आवडते आणि या ऑनस्क्रीन जोडीचे अनेक चाहते आहेत. खऱ्या आय़ुष्यातसुद्धा दोघे एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण असल्याचं म्हटलं जातं. परंतु, गेल्या काही काळापासून दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी विजयच्या पत्नीने संगीता यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी विजयचे लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला होता. तेव्हापासून विजय आणि त्रिशा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या.
सध्या विजयबरोबरच्या मैत्रीमुळे जरी त्रिशा चर्चेत आली असली तरी अभिनेत्री यापूर्वीसुद्धा तिच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलेली आहे. पण, असं असूनही तिच्याबद्दलच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहीत नाहीये. यापैकी एक म्हणजे खऱ्या आयुष्यात त्रीशा उच्चशिक्षित असून तिच्याकडे अनेक पदव्या आहेत. अभिनेत्रीचं शिक्षण किती झालं आहे, कोणत्या क्षेत्रात तिने पदवी मिळवली आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
त्रिशा कृष्णनचं शिक्षण किती?
त्रिशा कृष्णनची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तिचा जन्म ४ मे १९८३ रोजी तमिळनाडूतील चेन्नई येथे झाला. तिने सुरुवातीचं शिक्षण सेक्रेड हार्ट मॅट्रिक्युलेशन स्कूलमध्ये घेतलं. त्यानंतर तिने चेन्नईतील इथिराज कॉलेज फॉर वुमनमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी प्राप्त केली. मात्र, तिला क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनायचं होतं, पण चित्रपटांमध्ये संधी मिळाल्यामुळे तिने पुढचं शिक्षण सोडलं.
कॉलेजच्या काळातच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली
मॉडेलिंग करत असताना त्रिशाला चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. तिने १९९९ साली छोट्या भूमिकेतून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर हळूहळू तिने तमिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिने अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसह अनेक हिट चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. यासह तिने हिंदीतही काम केलं आहे.
वैयक्तिक आयुष्यामुळेही राहिलेली चर्चेत
त्रिशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. २०१५ साली तिचा उद्योजक वरुण मनियनबरोबर साखरपुडा झाला होता, पण नंतर त्यांचं नातं तुटलं. या नात्याबद्दल त्रीशाने सांगितलं होतं की, तिला अभिनय सोडण्याची अट घातली गेली होती, त्यामुळेच तिने साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला.
