सध्या देशात काश्मीर फाइल्स या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्यात काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाच्या वेदनांचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटातील काही पात्रांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. त्यापैकी एक बिट्टा कराटेची भूमिका मराठमोळ्या चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. चिन्मयने साकारलेला हा बिट्टा कराटे कोण आहे?, याबद्दल लोकांना उत्सुकता आहे. बिट्टा कराटे या दहशतवाद्याचं खरं नाव फारुख अहमद डार आहे. सध्या या बिट्टा कराटेचा एक जुना व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जाणून घेऊया कोण आहे बिट्टा कराटे? “मला आश्चर्य वाटलं मी मराठी आहे आणि…”, The Kashmir Files आणि बिट्टाची भूमिका कशी मिळाली? चिन्मय मांडलेकरने केला खुलासा बिट्टा कराटेचं खरं नाव फारुख अहमद डार आहे. तो जेकेएलएफ म्हणजेच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा दहशतवादी होता. फारुख अहमद डार हा उत्कृष्ट कराटे खेळाडू होता, म्हणून त्याचं नाव बिट्टा कराटे पडलं, असं म्हटलं जातं. बिट्टा कराटेने काश्मीरमध्ये अनेकांची हत्या केली. त्यानंतर तो एक फुटीरतावादी नेता म्हणून उदयास आला आणि त्याने संवादाद्वारे लोकांचे प्रश्न सोडवण्याची भाषा बोलायला सुरुवात केली. “काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या त्या १५०० हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार?” The Kashmir Files वरुन ओवेसींचा मोदी सरकारला सवाल मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिट्टा कराटेने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते. तो सीमेपलीकडे बांधलेल्या दहशतवादी तळांमध्ये शस्त्र चालवायला शिकला आणि मार्शल आर्टचे प्रशिक्षणही घेतले. अनेक वर्षांनी तो काश्मीरमध्ये परत आला आणि देशविरोधी कारवायांमध्ये गुंतला. मग हळूहळू त्याने काश्मीरमध्ये नरसंहार सुरू केला. स्थानिक प्रशासनाला कंटाळून आपण दहशतवादी बनल्याचे बिट्टा कराटे याने एका मुलाखतीत सांगितले होते. The Kashmir Files आधी काश्मीरच्या परिस्थितीवर बनले होते ‘हे’ लोकप्रिय चित्रपट दहशतवादी झाल्यानंतर बिट्टा कराटे जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटमध्ये सामील झाला. मग त्याने लोकांना मारायला सुरुवात केली, त्यामध्ये बहुतांशी काश्मिरी पंडितांचा समावेश होता. या हत्याकांडानंतर १९९० मध्ये बिट्टा कराटेला अटक करण्यात आली होती. मीडियासमोर, बिट्टा कराटेने २० हून अधिक खून केल्याचे कबूल केले, परंतु न्यायालयात तो जबानीवरून पलटला. त्यानंतर २००६ मध्ये टाडा कोर्टाने पुराव्याअभावी बिट्टाची जामिनावर सुटका केली होती. The Kashmir Files : ‘कश्मीर फाईल्स’बाबतच्या वादावर नाना पाटेकरांचं परखड मत; म्हणाले, “हिंदु आणि मुसलमान…”! बिट्टाची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, आरोपीवर गंभीर आरोप आहेत, परंतु त्याच्याविरोधात सरकारी पक्ष ठोस पुरावे देऊ शकले नाहीत. ज्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे ते जामिनावर बाहेर आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बिट्टा कराटे पुन्हा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटमध्ये सामील झाला. त्यानंतर तो स्वत:ला फुटीरतावादी नेता म्हणवून घेत लोकांसमोर आला. “लोक माझा तिरस्कार करत आहेत, ही माझ्यासाठी…”, The Kashmir Files ‘बिट्टा’ची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरने केले वक्तव्य दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर बिट्टाला एनआयएने २०१९ मध्ये दहशतवादी फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर केंद्र सरकारने JKLF म्हणजेच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटवर बंदी घातली. त्यानंतर अनेक फुटीरतावादी नेत्यांना देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे तुरुंगात पाठवण्यात आले.