अमेय आणि निपुणसोबत ‘ती’ तरुणी कोण?

कास्टिंग काउच म्हटलं की सर्वांचेच डोळे मोठे होतात.

सध्या नेटवरच्या विविध वेब सिरीजनी धुमाकुळ घातला आहे. प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी भाषेत रुळलेला ट्रेण्ड आता मराठीतही पाहता येणार आहे. भा.डी.प. म्हणजेच ‘भारतीय डीजीटल पार्टी’ या युट्युब चॅनेलची कास्टिंग काउच विथ अमेय अॅण्ड निपुण ही पहिली वेब सिरीज लवकरचं झळकणार आहे.
कास्टिंग काउच म्हटलं की सर्वांचेच डोळे मोठे होतात. अशीच काहीशी भन्नाट कल्पना घेऊन येत आहेत अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी. नुकताचं ‘कास्टिंग काउच’चा टीझर प्रसिद्ध करण्यात आला. या वेब सिरीजच्या पोस्टरमध्ये अमेय आणि निपुण हे काउचवर बसलेले दिसतात. आणि त्यांच्या मधोमध एक तरुणीदेखील बसली आहे. पण तिचा चेहरा प्रश्नचिन्हाने झाकल्याने ही तरुणी नक्की कोण, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर यात आहे ‘लय भारी’, ‘शोर इन द सिटी’, ‘हंटर’ या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री राधिका आपटे. ह्या वेब सिरीजची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. मात्र, तोपर्यंत त्याचा टीझर बघूया.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Whos that girl with amey wagh and nipun dharmadhikari