तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी गेल्या महिन्यात बाळाला जन्म दिला आहे. गरोदर असल्यापासूनच नुसरत जहाँ सतत चर्चेत होत्या. नुसरत पती निखिल जैनपासून विभक्त झाल्या आहेत. शिवाय निखिल जैन यांनी देखील बाळ त्यांचं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता हे बाळ कुणाचं अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. आई झाल्यानंतर नुरसत यांनी बऱ्याचवेळा या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. मात्र, एका महिलेला हा प्रश्न विचारणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता नुसरत यांनी केला आहे.

आई झाल्यानंतर नुसरत यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्या जोडीदाराविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर नुसरत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘मुलाचे वडील कोण आहेत? हा प्रश्न विचारणे म्हणजे सरळ सरळ एका महिलेच्या चारित्र्यावर विचारला जाणार प्रश्न आहे. मुलाच्या वडिलांना माहित आहे की ते मुलाचे वडील आहेत आणि आम्ही एकत्र पालकत्वाचा आनंद घेत आहोत’, असे नुसरत म्हणाल्या.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई?

आणखी वाचा : मित्राच्या घरी ड्रेस बदलणे उर्फी जावेदला पडले होते महागात, घरमालकाने दिली होती धमकी

२६ ऑगस्ट रोजी नुसरत यांनी मुलाला जन्म दिला. डिलिव्हरीपूर्वी नुसरत यांनी हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘Faith Over Fear’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. नुसरत या सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.