शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी १२ लोकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी आर्यनला अटक करण्यात आली. अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला ताब्यात घेतले आहे. सध्या एनसीबी कोठडीत असलेल्या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. या सगळ्यात आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने सगळ्यांचे आभार मानले आहे.

क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत “तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. प्रामुख्याने #ncb चे प्रयत्न आणि सतत छापे आणि त्यांनी निर्भयपणे घेतलीले मेहनत ओळखल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवाने जेव्हा बॉलिवूड गुंतलेले असते तेव्हा लोक बातम्यांमध्ये रस घेतात. एनसीबीने केलेल्या कामाबद्दल मीडिया सतत बातम्या देत असतात, सर्वात मोठ्या गुंडांना जे डॉन म्हणून ओळखले जातात त्यांना पकडत आहेत. आशा आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचे प्रेम आणि पाठिंबा वाढतच जाईल. फक्त बॉलिवूडवर लक्ष्य दिले जाते असं म्हणत समाजातील काही लोक यांच्यावर टीका करत आहेत, मी त्यांना विनंती करते की कृपया काळजीपूर्वक अभ्यास करा आणि नंतर कमेंट करा. आपण घरी सुरक्षित बसलो आहोत आणि आपल्या फोनवरून आपण कमेंट करत आहोत, आणि ते दररोज या गोष्टीचा समोरून संघर्ष करत आहेत. आपण निस्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्या या लोकांना पाठिंबा देऊया. बोलो जयहिंद,” अशा आशयाचे कॅप्शन क्रांतीने दिले आहे.

randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन
Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला?
government and government parties on social media viral claim false
आचारसंहितेनंतर सोशल मीडियावर सरकार, राजकीय पक्षांविरोधात लिहिणाऱ्यांवर होणार कारवाई? व्हायरल दावा खरा की खोटा, वाचा

आणखी वाचा : NCB च्या कोठडीत असणाऱ्या आर्यनसाठी McD चे बर्गर घेऊन पोहोचली गौरी खान पण…

आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

दरम्यान, मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर आर्यन खानच्या नावे कोणताही खास रुमचे बुकींग करण्यात आले नव्हते. मात्र या पार्टीच्या आयोजकांनी आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्यासाठी कॉम्प्लीमेंट्री रुम दिला होता. ज्यावेळी ते दोघेही या कॉम्प्लीमेंट्री रुममध्ये जात होते, त्याचवेळी एनसीबीच्या काही अधिकारी त्यांच्या समोर आले आणि त्यांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्या दोघांची झाडाझडती घेतली असता, आर्यनकडे काहीही मिळाले नाही. मात्र अरबाज मर्चंटच्या बुटात चरस मिळाली.