scorecardresearch

करिश्मा कपूर पुन्हा होणार नवरी? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधान

करिश्माने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

karishma kapoor,
करिश्माने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करिश्मा मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच करिश्माने चुलत भाऊ रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)च्या लग्नाला हजेरी लावली होती. पंजाबी लग्नात कलीरा टाकण्याचा एक विधी आहे. ज्यामध्ये वधू अविवाहित मुलींवर कलीरा वाजवते आणि कलीरा ज्याअविवाहीत मुलीवर पडते तिचे लवकर लग्न होते असे मानले जाते. आलिया भट्टचा कलीरा करिश्मा कपूरवर पडला, ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. त्यात कलीरासोबतचा हा फोटो आहे. करिश्मा ही रणबीरची चुलत बहीण आहे. करिश्माने तिचा मुलगा कियानसोबत लग्नाला हजेरी लावली होती. या फोटोत करिश्मा कलिरा कॅमेऱ्यात दाखवते. कलिरा हातात असताना तिच्या चेहऱ्यावर असलेला आनंद त्या फोटोत दिसून येत आहे. तर करिश्माच्या हातात कलीरा पाहिल्यानंतर तिच्या आजुबाजूला असलेले सगळे आनंदीत असल्याचे दिसते. यामध्ये रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी, चित्रपट निर्माता करण जोहर आणि आलियाच्या काही मैत्रीणी दिसत आहेत. हे फोटो शेअर करत करिश्माने कॅप्शन दिले की “इन्स्टाग्राम VS रिअॅलिटी. कलीरा माझ्यावर पडला!”

आणखी वाचा : रानू मंडल नवरीच्या वेषात, ‘कच्चा बदाम’वर गायलेले गाणे झाले व्हायरल

आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्रींचे स्टायलिश मंगळसूत्र पाहिलेत का?

पंजाबी लग्नाच्या विधींमध्ये नवरी तिच्या लग्नाच्या बांगड्यांना जोडलेले सोन्याचे दागिने घालते. त्यानंतर ती तिच्या बहिणी आणि मैत्रिणींच्या डोक्यावर तिचे हात हलवते आणि जर कलीरा त्यांच्यावर पडला तर तिचं पुढचं लग्न असणार असे म्हटले जाते.

आणखी वाचा : आर माधवनच्या मुलाने परदेशात भारताचे नाव उंचावले, मुलाचा व्हिडीओ शेअर करत अभिनेता, म्हणाला…

दरम्यान, या आधी करिश्माने आलिया आणि रणबीरसोबत फोटो शेअर करत त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. करिश्मा ही रणधीर कपूर आणि बबीता यांची मुलगी आहे. करिश्मा आणि करीना या दोघी बहिणी आहेत. करीनाने पती सैफसोबत रणबीर आणि आलियाच्या लग्नात हजेरी लावली होती. करिश्माने आधी व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केले होते. तिला दोनं मुलं असून मुलीचं नाव समायरा असून मुलाचं नाव कियान आहे. २०१६ मध्ये करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will karisma kapoor become a bride again alia bhatt kaleera fell on the actress she danced with joy dcp

ताज्या बातम्या