तेलुगू अभिनेता एनटी रामास्वामी यांच्यावर हैदराबादमधील थिएटरमध्ये हल्ला झाला. ही घटना अंजन रामचंद्र यांच्या ‘लव्ह रेड्डी’ या नवीन चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर घडली. रामास्वामी यांनी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर एका महिलेला इतका राग आला की तिने थेट स्टेजवर जाऊन अभिनेत्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसतंय की थिएटरमध्ये हा चित्रपट सुरू आहे आणि त्यानंतर चित्रपटा सगळे कलाकार समोर स्टेजवर उभे राहतात. तेवढ्यात एक महिला स्टेजवर येते आणि एनटी रामास्वामी यांना मारहाण करण्यास सुरुवात करते. सर्वात आधी महिलेने अभिनेत्याची कॉलर धरली आणि नंतर मारहाण करायला सुरुवात केली. महिला आली आणि तिने मारलं हे काही क्षणातच घडलं त्यामुळे रामास्वामींनाही समजू शकत नाही की नेमकं काय होतंय. त्यानंतर इतर लोक महिलेला तिथून दूर नेताना दिसत आहेत.

south star was first Indian to charge 1 crore per film
अमिताभ बच्चन, शाहरुख-सलमान खान नव्हे तर ‘हा’ आहे एक कोटी मानधन घेणारा पहिला भारतीय अभिनेता
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
prakash raj son death
पाच वर्षीय मुलाच्या आकस्मिक निधनाने खचले होते प्रकाश राज, म्हणाले, “दुःख वाटण्यापेक्षा…”
suriya move to mumbai with wife jyothika and children
‘हा’ साऊथ सुपरस्टार पत्नी अन् मुलांसह मुंबईत झाला स्थायिक; म्हणाला, “या शहरातील शांती आणि…”
do patti
अळणी रंजकता
Sumeet Raghvan on toll free
Sumeet Raghvan : “आम्हाला टोलमाफीचं गाजर नको, त्यामुळे…”, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत सुमीत राघवनने व्यक्त केला संताप!
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी

हेही वाचा – आर्या जाधवचा फोन आल्यावर सूरज चव्हाण म्हणाला, “कोण पाहिजे?” रॅपरने माफी मागितली अन्…, पाहा Video

महिलेचा राग मात्र बराच वेळ शांत होत नाही. ती आरडाओरडा करते आणि रामास्वामी यांच्यावर चिडते. पुन्हा मारण्याचा प्रयत्न करते. तिथे उपस्थित लोक तिला सांभाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एनटी रामास्वामी यांच्याबरोबर घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – ‘धर्मवीर २’ OTTवर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

दरम्यान, रामास्वामी यांनी चित्रपटात खलनायकाची भूमिका केली आहे. त्यांचे पात्र या सिनेमातील एका प्रेमी युगुलाचे शत्रू आहे. हे सगळं प्रकरण शांत झाल्यावर या महिलेला तिने रामास्वामी यांना का मारलं याबाबत विचारण्यात आलं. तर त्यांनी चित्रपटात प्रेमी युगुलाला त्रास दिला त्यामुळे मारहाण केली, असं त्या महिलेने सांगितल्याचे वृत्त आहे. अंजन रामचंद्र आणि श्रावणी कृष्णवेणी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा – जान्हवी किल्लेकर पोहोचली ‘गुलिगत’च्या गावी! सूरज चव्हाणची घेतली भेट, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, “बहिणीचा दर्जा दिला…”

हा व्हिडीओ पाहून लोक हे खरंच घडलं याबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काहींना हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. चित्रपटाला प्रसिद्धी मिळावी, यासाठी जाणीवपूर्वक हा व्हिडीओ बनवण्यात आला असं काही जण म्हणत आहेत. तर काहींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. रामास्वामी यांचा अभिनय इतका खरा होता की काकूंचा राग अनावर झाला, अशाही कमेंट्स व्हिडीओवर आहेत.