women alleged ms marvel fame actor mohan kapur said he send his dick pick when i was 15 years old | Loksatta

“मला गुप्तांगाचा फोटो…” ‘मिस मार्वेल’ फेम अभिनेत्यावर महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

‘मिस मार्वेल’ फेम अभिनेता मोहन कपूरवर महिलेचे लैंगिक शोषणाचे आरोप

“मला गुप्तांगाचा फोटो…” ‘मिस मार्वेल’ फेम अभिनेत्यावर महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप
मोहन कपूरवर एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

‘मिस मार्वेल’ फेम अभिनेता मोहन कपूरवर एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारवरील ‘मिस मार्वेल’ ही सीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजमध्ये मोहन कपूरने युसूफ खान ही मुख्य पात्राच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्याच्यावर महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मोहन कपूरने मी १५ वर्षांची असताना लैंगिक छळ केला असल्याचं महिलेचे म्हणणं आहे. या महिलेने ट्वीट करत ही याबाबत भाष्य केलं आहे. “आम्ही सुरुवातीला चॅंटिगद्वारे खूप बोलायचो. त्यानंतर त्याने फ्लर्ट करायला सुरुवाच केली. जेव्हा मी १५ वर्षांची होते तेव्हा त्याने मला त्याच्या गुप्तांगाचा फोटो पाठवला होता. या कृतीसाठी तो सतत माफी मागत होता. तणावात असल्यामुळे मीही त्याला माफ केलं होतं. परंतु त्यानंतरही त्याने अनेकदा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला”, असं महिलेने म्हटलं आहे.

हेही वाचा>> गरोदर असल्याच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन, म्हणाली…

पुढे महिलेने ट्वीटमध्ये “मी त्याला वडिलांसारखे मानायचे. २०२०मध्ये आमच्यात शेवटचं बोलणं झालं. मला हे सगळं असह्य झाल्यामुळे मी रडत होते. मला वाटत होतं तो माझी माफी मागेल. परंतु, तुझ्यावर माझा विश्वास नाही. मला आता व्हिडीओ कॉल कर आणि माझ्याशी मैत्री कायम ठेवायची असेल तर नग्नावस्थेतील फोटो पाठव, असं तो मला म्हणाला”, असं म्हणत हॅशटॅग मीटू लिहीलं आहे.  

हेही वाचा>> Video: अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा, ‘जय हिंद’ म्हणताच…

दरम्यान, मोहन कपूरने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. महिलेचे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर मोहन कपूरने त्याचं ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे. मोहन कपूर मनोरंजनविश्वातील नावाजलेला अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांत काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 15:35 IST
Next Story
“यामागे काही…” आस्ताद काळेने सांगितले उजव्या दंडावर छत्रपती शिवरायांचा टॅटू काढण्यामागचे खरे कारण