नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, जाहिरातींसाठी कॉपी रायटर, दिग्दर्शक, विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी संहिता लेखन अशा विविध भूमिकांमधून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारा चेहरा म्हणून क्षितिज पटवर्धन याची ओळख आहे. क्षितिजने अगदी कमी कालावधीमध्येच कलाविश्वामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा हा प्रवास अगदी सोपाही नव्हता. नुकतंच त्याला ‘मिर्ची मराठी म्युझिक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – VIDEO : अभिनेता-दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे सुपरहिट, अन् वयाच्या ७९व्या वर्षी शेतामध्ये कष्ट करताहेत वडील

क्षितिजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे सन्मान चिन्हाचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. त्याने म्हटलं की, “५४ चित्रपट, १२५ गाण्यांनंतर पहिलं मिर्ची मराठी म्युझिक पुरस्कार. सर्वोत्कृष्ट अल्बम २०२०-२१ चित्रपट ‘धुरळा’. आता अधिकृतरित्या स्वतःला गीतकार म्हणायला हरकत नाही.” क्षितिजने बऱ्याच मेहनतीनंतर संगीत क्षेत्रामधील हा पुरस्कार पटकावला आहे.

पाहा फोटो

‘धुरळा’ चित्रपटासाठी क्षितिजने उत्तम गाणी लिहिली. शिवाय या चित्रपटाची पटकथा देखील क्षितीजचीच होती. ‘धुरळा’साठीच क्षितीजला हा पुरस्कार मिळाला आहे. त्याला हा पुरस्कार मिळताच नेटकऱ्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच सेलिब्रिटी मंडळींनी देखील क्षितिजचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – “आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा”; एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेनंतर किरण मानेंचा संताप

पटकथा लेखक म्हणून क्षितिजने आजवर ‘माऊली’, ‘डबल सीट’, ‘क्लासमेट’, ‘टाइमपास२’, ‘फास्टर फेणे’ सारखे मराठी चित्रपट केले. तसेच ‘खारी बिस्कीट’, ‘दगडी चाळ’, ‘क्लासमेट्स’, ‘हाफ तिकिट’, ‘डबल सीट’ सारख्या नावाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी त्याने गीतकार म्हणून काम केलं. हा पुरस्कार म्हणजे गीतकार म्हणून त्याच्या कामाची पोचपावती आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer lyricist kshitij patwardhan honoured with mirchi marathi music award he share post on instagram kmd
First published on: 27-06-2022 at 15:18 IST