प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सरोगसीबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण आहे. शुक्रवारी संध्याकाळी बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांनी घोषणा केली की ते सरोगसीद्वारे एका मुलाचे पालक बनले आहेत. सरोगसीवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, लेखिका तस्लिमा नसरीन यांनी या प्रक्रियेवर टीका केली आणि सरोगसीद्वारे मातृत्व प्राप्त करणाऱ्या मातांच्या भावनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तस्लिमा नसरीन यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. “सरोगसीच्या माध्यमातून त्या मातांना त्यांची रेडीमेड मुलं मिळाल्यावर त्यांना कसे वाटते? मुलांना जन्म देणाऱ्या मातांप्रमाणेच त्यांच्या मुलांबद्दल भावना आहेत का?,” असे नसरीन यांनी म्हटले आहे. “गरीब महिलांमुळे सरोगसी शक्य आहे. श्रीमंत लोकांना त्यांच्या स्वार्थासाठी नेहमीच समाजात गरिबी पहायची असते. जर तुम्हाला मूल वाढवायचे असेल, तर बेघरांना दत्तक घ्या. मुलांना तुमचे गुण वारसाहक्काने मिळाले पाहिजेत. हा फक्त स्वार्थीपणा आहे. अहंकारी अहंकार,” असे नसरीन म्हणाल्या.

यावरुन सोशल मीडिया युजर्सनी ही वैयक्तिक निवड आहे आणि बऱ्याच बाबतीत लोक वैद्यकीय कारणांसाठी सरोगसीचा पर्याय निवडतात असे म्हटले आहे. मात्र, तस्लिमा यांनी प्रियांका चोप्राच्या नावाचा उल्लेख केला नाही. पण त्याचे हे ट्विट प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या घोषणेनंतर आले आहे. प्रियांका आणि निक यांनी सरोगसीद्वारे पालक बनल्याची घोषणा केली होती.

प्रियांकाने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. निकला टॅग करत इंस्टाग्रामवर एक नोट शेअर करताना प्रियांकाने, “आम्ही सरोगसीच्याद्वारे एका बाळाचे स्वागत केले आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद,” असे म्हटले होते. निकनेही हीच पोस्ट त्याच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे.

सरोगसी म्हणजे काय?

सरोगसीचे ट्रॅडिशनल (Traditional Surrogacy) आणि जेस्टेशनल (Gestational Surrogacy) असे दोन प्रकार आहेत. ट्रॅडिशनल सरोगसीमध्ये होणाऱ्या बाळाच्या पित्याच्या शुक्राणूंचं सरोगेट मदरच्या बीजांडाशी मिलन घडवलं जातं. त्यामुळे संबंधित महिला ही जन्माला येणाऱ्या बाळाची जैविक आई अर्थात बायोलॉजिकल मदर असते. जेस्टेशनल सरोगसीमध्ये मात्र सरोगेट मदरचं आणि बाळाचं रक्ताचं नातं नसतं. होणाऱ्या बाळाच्या आई-वडिलांच्याच अनुक्रमे बीजांड आणि शुक्राणूचा संयोग प्रयोगशाळेत केला जातो. त्यातून तयार झालेला भ्रूण टेस्ट ट्यूबद्वारे सरोगेट मदरच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer taslima nasreen surrogacy create readymade babies abn
First published on: 22-01-2022 at 22:27 IST