‘महाभारता’मध्ये या WWE सुपरस्टारने साकारलेली ‘भीम’ ही व्यक्तिरेखा

हा WWE सुपरस्टार झळकला होता महाभारत मालिकेत

‘महाभारत’ ही आपल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय पौराणिक कथा आहे. या कथेवर आजवर अनेक लहानमोठ्या मालिका तयार झाल्या आहेत. यापैकी एक मालिका २०१३ मध्ये स्टार प्लस वाहिनीने तयार केली होती. यामध्ये एका WWE सुपरस्टारने भीम ही व्यक्तिरेखा साकारली होती. हा अभिनेता भारतातील सर्वोत्कृष्ट किक बॉक्सर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो.

जरुर पाहा – “हॉस्पिटलचं बिल भरून मी कंगाल झालोय”; आजारी अभिनेत्याने मागितली आर्थिक मदत

अवश्य पाहा – मराठी अभिनेत्रीनं पोस्ट केला नवऱ्याबरोबरचा किसींग करताना फोटो

महाभारत मालिकेत झळकलेल्या या फायटरचं नाव सौरव गुर्जर असं आहे. सौरव एक WWE फायटर आहे. उंची आणि भारदस्त शरीर पाहून भीम या व्यक्तिरेखेसाठी त्याची निवड करण्यात आली होती. महाभारत ही त्याच्या करिअरमधील पहिली मालिका होती. यापूर्वी त्याने कधीही अभिनय केला नव्हता. त्यामुळे शोच्या निर्मात्यांनी ब्योमकेश बक्षी फेम रजित कपूर यांच्याकडे त्याला अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी पाठवले होते. सर्वप्रथम त्यांनी सौरवला हिंदी भाषा बोलायला शिकवली. त्यानंतर अभिनयाचे धडे दिले.

सौरवने या वर्षी जानेवारी महिन्यात WWE मध्ये पदार्पण केले. तो WWEच्या NXT सीरिजमध्ये स्पर्धा खेळतो. त्याची जबरदस्त फाईटिंग स्टाईल पाहून त्याला WWE रॉमध्ये देखील खेळण्याची संधी मिळाली होती. सध्या सौरभ बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. येत्या काळात तो रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Wwe superstar saurav gurjar played bheem in mahabharat mppg

ताज्या बातम्या