Video : द ग्रेट खलीला आव्हान देणाऱ्या तरुणाची झाली अशी अवस्था

हा तरुण खलीला आव्हान देत होता, पण….

WWE सुपरस्टार द ग्रेट खली रेसलिंग सोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यामातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याने टिक-टॉकवर एक गंमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपले हसू आवरता येणार नाही.

काय आहे व्हिडीओमध्ये?

@thegreatkhali8♬ original sound – the great Khali

या व्हिडीओमध्ये द ग्रेट खली एका तरुणासोबत दिसत आहे. हा तरुण खलीच्या तुलनेत एकदमच दुबळा दिसत आहे. खली त्याला पोटावर ठोसे मारायला सांगतो. तो आपली संपूर्ण ताकद लावून खली हल्ला करतो. मात्र महाबलशाली खलीवर त्या हल्ल्याचा काहीच परिणाम होत नाही. तेवढ्यात खली त्याची मान पकडतो. त्याला तो मारणार इतक्यात तो तरुण खलीची माफी मागतो. त्यामुळे खली त्याला सोडून देतो. असा हा विनोदी व्हिडीओ खलीने आपल्या टिक-टॉक अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

खलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत एक कोटी ८० लाख वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. यावरुन आपल्याला खलीच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. या व्यतिरिक्त खलीने असे अनेक व्हिडीओ टिक-टॉकवर पोस्ट केले आहेत. या व्हिडीओंना देखील कोट्यवधींमध्येच व्हूज आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Wwe superstar the great khali tik tok funny video viral mppg

ताज्या बातम्या