काळजाचा ठोका चुकवणारा ‘वाय’ हा चित्रपट आता सर्वत्र प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचा प्रीमियर अनेक मान्यवारांच्या उपस्थितीत पार पडले. काही दिवसांपूर्वी हातात मशाल धरलेले मुक्त बर्वेचे एक थरारक पोस्टर प्रदर्शित झाले होते. याचा नेमका अर्थ काय, यावर अनेक चर्चाही झाल्या. याचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळाले असून या विषयाचे समर्थन करत पुण्यातील एका शोदरम्यान काही महिला प्रेक्षकांनी या विषयाला, मुक्ताला आणि तिच्या या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ‘वाय’चा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असल्याचा हा संकेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदेंचा फोन आला, म्हणाले…”, शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

मुक्ता बर्वे या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिक्रियांबाबत म्हणते, “समाजात घडणाऱ्या एका ज्वलंत विषयवार भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि अशा घटना आपल्या आजूबाजूला सर्हास घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो किंवा मग आपण त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतो. त्यामुळे या घटना समाजापर्यंत पोहोचाव्यात म्हणून हा विषय आम्ही प्रेक्षकांपर्यंत आणला आहे. प्रेक्षकांकडून, सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून, समीक्षकांनच्या मिळणाऱ्या प्रतिक्रया पाहून हा चित्रपट अनेकांपर्यंत पोहोचला असून चित्रपटाच्या विषयांचे गांभीर्य लोकांच्या लक्षात येत आहे आणि हीच आमच्या कामाची पोचपावती आहे, असे मी समजते.”

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

आणखी वाचा : ‘Love You’, अखेर सई ताम्हणकरने प्रेमाची दिली कबुली, दौलतरावांच्या ‘त्या’ पोस्टवर केली कमेंट

कन्ट्रोल एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले असून पटकथा व संवाद अजित वाडीकर , स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत. या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक, रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘वाय’ची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Y movie female viewer support s mukta barve prajakta mali dcp
First published on: 25-06-2022 at 18:58 IST