दरवर्षीप्रमाणे यंदाही याहू (Yahoo) ने सर्वाधिक सर्च केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. यात २०२१ या संपूर्ण वर्षात इंटरनेटवर कोणत्या व्यक्तींना सर्वाधिक सर्च करण्यात आले याची यादी जाहीर केली आहे. यात प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, क्रिकेटपटू आणि राजकारणी व्यक्तींच्या नावांच्या यादींचा समावेश आहे. सर्वाधिक सर्च केलेले सेलिब्रिटी या यादीत यंदा अनेक नवनवीन नावे पाहायला मिळत आहेत.

याहू (Yahoo) ने जाहीर केलेल्या यादीत यंदा टॉपवर सिद्धार्थ शुक्ला आणि करीना कपूर यांच्या नावाचा समावेश आहे. तर यंदा या यादीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश झाला आहे.

Rohit sharma becomes first Indian player to win 250 T20
Rohit Sharma Records: रोहित शर्माच्या नावे अनोखा विक्रम, टी-२० मध्ये ही कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
IPL 2024 : सर्वांच्या सहमतीनेच निर्णय! सातव्या क्रमांकावर खेळण्यावरून हार्दिकची पोलार्डकडून पाठराखण
India is the third most polluted country in the world What are the potential dangers of this
विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन ही बातमी संपूर्ण इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का होता. सिद्धार्थ शुक्लाचे निधन हृदयविकारच्या झटक्याने झाले. सिद्धार्थ शुक्लाचा फार मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याच्या खासगी आयुष्यासह इतर गोष्टी या इंटरनेटवर सर्च केल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक सर्च केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींमधील सेलिब्रेटींच्या यादीत सिद्धार्थ शुक्ला हा पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “मी मेल्यानंतर…”; कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आहे. बिग बॉस, अंतिम यासारख्या अनेक कारणांमुळे सलमानचा या यादीत समावेश झाला आहे. त्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन, तर चौथ्या क्रमांकावर कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार याचा समावेश आहे.

तसेच पाचव्या क्रमांकावर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा समावेश आहे. पुनीत राजकुमार आणि दिलीप कुमार या दोघांचेही निधन झाले आहे. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग त्यांच्याबद्दलची माहिती, तसेच काही जुन्या आठवणींसाठी या दोघांना सर्च करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे यंदा या यादीत एका नवीन अभिनेत्याचाही समावेश झाला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव या यादीत ७ व्या क्रमांकावर आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे आर्यन खान हा चांगलाच चर्चेत आला होता.