बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. नुकतीच अभिनेत्री यामी गौतमनं या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली होती. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत आणि एका काश्मिरी पंडिताची पत्नी असण्याच्या नात्याने मला याची पूर्ण जाणीव आहे असं यामीनं म्हटलं होतं.

नुकतंच यामी गौतमनं यावर ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं. ती म्हणाली, ‘आपल्या सर्वांनाच या चित्रपटाचा विषय काय आहे हे व्यवस्थित माहीत आहे आणि मी ट्विटरवर जी पोस्ट लिहिली ती मनापासून लिहिली होती. मला माझ्या नवऱ्याकडून म्हणजेच आदित्य धरकडून काश्मिरी पंडितांचा इतिहास समजला होता. काश्मिरी पंडित पती आणि त्याच्या नातेवाईकांकडून मला या विषयावर बऱ्याच गोष्टी समजल्या. मात्र देशातील बहुसंख्य जनता अजूनही अनभिज्ञ आहे. त्यामुळे याच विषयावर एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि त्यात सत्य घटना दाखवण्यात आली आहे. हे जेव्हा समजतं तेव्हा अर्थातच त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे.’

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Randeep Hooda says he sold his fathers properties for Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटासाठी वडिलांची मालमत्ता विकली, रणदीप हुड्डाचा खुलासा; म्हणाला, “मी खूप…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

आणखी वाचा- The Kashmir Files वर बॉलिवूड गप्प का? विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया चर्चेत

यामी पुढे म्हणाली, ‘जेव्हा काश्मिरमध्ये या सर्व गोष्टी घडल्या त्यावेळी आम्ही खूपच लहान होतो. त्यामुळे याबाबत आम्हाला काही आठवत नाही हे खरं आहे. पण जेव्हा तुम्ही त्यांचे अनुभव ऐकता किंवा त्या समुदयाचा भाग होता तेव्हा तुम्हाला समजतं की हा चित्रपट का गरजेचा आहे. लोक या चित्रपटाशी भावनात्मकरित्या जोडले गेले. त्यामुळे त्याला जाहिरपणे पाठिंबा द्यायला हवा. या विषयावर बोलायला हवं. मी सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत जे लिहिलं ते मनापासून लिहिलं आहे.’

आणखी वाचा- ‘चंद्रमुखी’तील ‘दौलत’ आला समोर! मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारखे प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.