“तुला तुझ्या नवऱ्याने कसे प्रपोज केले?,” यामी गौतम म्हणते…

या कार्यक्रमाला यामीसह अभिनेता सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिसने हजेरी लावली होती.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे यामी गौतम. काही दिवसांपूर्वीच यामी विवाहबंधनात अडकली. यामीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपट ‘भूत पुलिस’ साठी चांगली चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘द कपिल शर्मा शो’ या लोकप्रिय कॉमेडी शो मध्ये हजेरी लावली. यावेळी कपिलने यामीला लग्नाविषयी काही प्रश्न विचारले. ज्याची यामीने फार मजेशीररित्या उत्तर दिली.

‘द कपिल शर्मा शो’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो मध्ये प्रत्येक सेलिब्रेटीला काही ना काही प्रश्न विचारले. यात अभिनेता कृष्णा अभिषेकने सपना बनून यामीला “तुला आदित्यने कसे प्रपोज केले?” असा प्रश्न विचारला. त्यावर यामी म्हणाली, “त्याने मला प्रपोज केलेच नाही.” “आम्हा दोघांमध्ये कोणी कोणाला प्रपोज केले नाही, असचं लग्न झाले, असेही तिने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

त्यानंतर कपिल यामीला म्हणतो की ‘आम्ही असं ऐकलं आहे की यामी आणि आदित्यला हनीमूनला जाताना त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जावे अशी इच्छा होती.’ यावर उत्तर देत कपिल स्वत: म्हणाला, ‘तुम्हाला कोणी सांगितलं नाही का तिथे कुटुंबाला घेऊन जात नाही.’ तर यावर उत्तर देत यामी म्हणाली, ‘दोघांची इच्छा होती की सगळ्यांनी एकत्र गेलं पाहिजे.’ यावर हसत सैफ यामीला म्हणतो ‘खरंच’, तर यामी ‘हो’ असं उत्तर देते. या कार्यक्रमाला यामीसह अभिनेता सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिसने हजेरी लावली होती. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

यामीने याच वर्षी ४ जून रोजी दिग्दर्शक आदित्य घरशी लग्न केले. त्यांच्या लग्नाने सगळ्या चाहत्यांना धक्काच बसला होता. यामीने स्वत: त्यांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या लग्नात फक्त त्यांच कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Yami gautam kapil sharma comedy show know how aditya dhar asked her to marry him nrp

ताज्या बातम्या