scorecardresearch

“सलाम रॉकी बॉय…”, केजीएफ फेम यशची मुलगी देखील झाली वडिलांची फॅन

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

yash, kgf, kgf 2,
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दाक्षिणात्य अभिनेता यशचा (Yash) काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ २’ (KGF 2) ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट एका मागोमाग एक नवे रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. एवढंच नाही तर या चित्रपटातील यशचे डायलॉग सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. प्रत्येकाला रॉकीचे वेड लागले आहे. या सगळ्यात यशच्या मुलीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ यशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओवरून यशची लाडकी लेक आयरा ही त्याच्या रॉकी या भूमिकेची चाहती असल्याचे दिसते. आयरा ‘सलाम रॉकी भाई..रॉ रॉ रॉकी’ म्हणताना दिसत आहे. त्याचबरोबर त्याची ही स्टाइल पाहून स्वत: रॉकी म्हणजेच यशही त्याचा चाहता झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “पहाटेची सुरुवात…रॉकी बॉयची चेष्टा करत होते,” असे कॅप्शन यशने दिले आहे.

आणखी वाचा : मे महिन्यात या ५ राशीच्या लोकांना मिळेल अमाप संपत्ती, कुबेर देवाचा राहील आशीर्वाद !

आणखी वाचा : Lock Upp : “…तर देव तुला मूल कसं देईल”, पायल रोहतगीवर संतापलेल्या शिवम शर्माचं वादग्रस्त विधान

KGF आणि KGF 2 च्या यशानंतर आता चाहते KGF च्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा करत आहेत. ट्विटर असो वा इन्स्टाग्राम, चाहत्यांमध्ये केजीफी चॅप्टर ३ बद्दल उत्साह पाहायला मिळत आहे. चॅप्टर २ मध्ये दाखवण्यात आलेला सस्पेन्सचा उलगडा चॅप्टर ३ मध्ये होईल असे प्रेक्षकांना वाटते. यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त आणि रवीना टंडन देखील मुख्य भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yash daughter became fan of kgf s rocky see the viral video dcp

ताज्या बातम्या