बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे. येत्या ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला आहे. अक्षय कुमारच्या आगामी पृथ्वीराज या चित्रपटाचे नाव आता सम्राट पृथ्वीराज असे असणार आहे. श्री राजपूत करणी सेनेशी केलेल्या अनेक चर्चेनंतर यशराज फिल्मसने चित्रपटाच्या नावात बदल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री राजपूत करणी सेनेने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला होता. काही दिवसांपूर्वीच करणी सेनेने एक पत्र लिहित या चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली होती. मात्र YRF च्या या निर्णयाच्या एक दिवस आधी करणी सेनेने पत्र लिहून नाव बदलण्याची मागणी केली होती. तसेच करणी सेनेनं या चित्रपटाच्या नावाविरोधात कोर्टात धाव घेत जनहित याचिका देखील दाखल केली होती. यानंतर याबाबत अनेक चर्चा आणि नोटीस मिळाल्या होत्या. राजपूत समाजाच्या भावना आणि मागणीचा विचार करता पृथ्वीराज चित्रपटाचे निर्माते यशराज फिल्म्सनं या चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग, अमित शाहांसह अनेक केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

यशराज फिल्मसचे संपूर्ण निवदेन

याबाबत यशराज फिल्मसने निवदेन दिले आहे. या चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर यशराज फिल्म्सद्वारे करणी सेनेला एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रात यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षये विधानी यांनी म्हटलं की, गेल्या ५० वर्षांपासून यशराज फिल्म्स भारतीय सिनेसृष्टीत काम करत आहे. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात यशराज फिल्म्सनं अनेक आयकॉनिक चित्रपट दिले आहेत. आम्ही सातत्यानं रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहोत आणि करत राहू.

आमच्या चित्रपटाच्या नावासंबंधी तुमची जी तक्रार आहे त्याची आम्ही दखल घेतली आहे. यावर आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, आमच्या कोणाच्याही भावना दुखावतील किंवा शूर योद्धा पृथ्वीराज चौहान यांचा अपमान होणार नाही याची काळजी घेऊ. उलट आम्ही त्यांच्या शौर्याचं, कामगिरीचं आणि देशाच्या इतिहासात दिलेलं योगदानाचा आदर करतो.

यासंदर्भात आपल्यामध्ये झालेल्या अनेक चर्चांनंतर आम्ही शांततेत तुमच्या तक्रारीचं निवारण करत आहोत. आम्ही चित्रपटाचं नाव बदलून ते ‘सम्राट पृथ्वीराज’ असं करू. आम्ही श्री राजपूत करणी सेना आणि त्यांच्या सदस्यांचं आभार मानतो. तुम्ही आमच्या चित्रपटासंबंधीच्या भावना समजून घेतल्या, असे त्याने यात म्हटले आहे.

Prithviraj Trailer: “धर्मासाठी जगलोय आणि धर्मासाठी मरेन…”, अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’चा ट्रेलर प्रदर्शित

‘पृथ्वीराज’ या चित्रपटात पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहे. यात पृथ्वीराज चौहान यांनी शौर्याने युद्धे कशी जिंकली आणि दिल्लीची सुल्तानी कशी मिळवली हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील लढाईचे दृश्यही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाद्वारे २०१७ ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेता संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा आणि मानव वीज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yash raj films changed prithviraj name to samrat prithviraj starring akshay kumar and manushi chillar nrp
First published on: 28-05-2022 at 10:29 IST