#ThugsOfHindostan : आमिर पुकारणार एक नवीन युद्ध; ‘बाहुबली २’ला देणार का टक्कर?

आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला असून या व्हिडिओतील पार्श्वसंगीत संगीत आणि एकंदरीत दृश्ये पाहिल्यावर ‘बाहुबली २’ची आठवण नक्कीच होते.

thugs of hindostan
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाचा लोगो प्रदर्शित

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे दोघे मिळून एक नवीन युद्ध पुकारणार आहेत. अर्थात हे युद्ध रुपेरी पडद्यावरील आहे. या दोघांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचा लोगो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना अद्भुत अनुभव देण्यासाठी आमिर आणि त्याच्या टीमने केलेली कठोर मेहनत या लोगोतून पाहायला मिळते.

विजांचा कडकडाट, ध्वज, राजवाडे आणि एकमेकांना भिडणाऱ्या तलवारी हे सर्व या लोगोच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडिओतील पार्श्वसंगीत संगीत आणि एकंदरीत ही दृश्ये पाहिल्यावर ‘बाहुबली’ची आठवण नक्कीच होते. आमिर आणि बिग बींसोबतच यामध्ये कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विजय कृष्ण आचार्य यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

वाचा : मोहनीश बहलच्या मुलीला सलमान करतोय बॉलिवूडमध्ये लाँच

येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ नोव्हेंबरमध्ये यशराज निर्मित हा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिरचा हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वांत मोठा चित्रपट मानला जात आहे. प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा जबरदस्त अनुभव देण्यासाठी आम्ही याची एडिटिंग प्रीव्हूय थिएटरमध्ये करत आहोत अशी माहिती दिग्दर्शकांनी दिली होती. तेव्हा आमिरचा हा फँटसी अॅक्शन अॅडवेंचर चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे येत्या दिवाळीतच स्पष्ट होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Yash raj unveils the logo of thugs of hindostan starring amitabh bachchan aamir khan katrina kaif and fatima sana shaikh

ताज्या बातम्या