छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रियंवदा कांतच्या वडिलांचे निधन झाले आहे. ७ मे रोजी तिच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. प्रियंवदाने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. ही पोस्ट शेअर करत ती भावुक झाली आहे.

प्रियंवदाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझे पहिले प्रेम. मी इतका बुद्धीवान, आकर्षक आणि प्रेमळ व्यक्ती पाहिला नव्हता. मला तुमची कायम आठवण येईल’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा : ‘बाबा… तुमच्याशिवाय…’, वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीची भावुक पोस्ट

प्रियंवदाने ‘स्पिलट्सविला १२’मध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी ती चर्चेत होती. आता सध्या ती लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये काम करताना दिसत आहे. तसेच प्रियंवदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.