मोहितने घडवून आणला चिन्याचा अपघात, हे कळल्यावर काय करणार मालविका?

मालविकाच्या सांगण्यावरून मोहित ओमच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करतोय पण काही केल्या ओम हार मानत नाही

yeu kashi tashi me nandayla, sweetu, om, sweetu om, chinya,
स्वीटू आणि ओमच्या प्रेमाची नलू परीक्षा घेतेय

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला हि लोकप्रिय मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. स्वीटू आणि ओमच्या प्रेमाची नलू परीक्षा घेतेय. अनेक अडचणींवर मात करून ओम या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी धडपड करतोय. त्यातच स्वीटू आणि ओममध्ये गैरसमज देखील निर्माण होत आहेत पण त्यामागे मोहित आणि मालविका यांचा हात आहे.

मालविकाच्या सांगण्यावरून मोहित ओमच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करतोय पण काही केल्या ओम हार मानत नाही आहे हे बघितल्यावर मोहितच्या डोक्यात आता नवीन डाव शिजतोय. चिन्याला नोकरी लागल्यामुळे घरी सगळे खुश आहेत आणि त्याच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी मोहित त्याचा अपघात घडवून आणतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

हे कळल्यावर स्वीटू आणि ओम तातडीने चिन्याकडे जातात आणि ओमच्या सांगण्यावरून चिन्यावर उपचार देखील सुरु होतात पण मालविका हिला कळतं कि हा अपघात घडवून आणण्यामागे मोहितचा हात आहे. अशावेळी मालविका साळवी कुटुंबाची साथ देईल? कि मोहितच्या चुकीवर पडदा टाकेल? मालविकाचा स्टॅन्ड काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Yeu kashi tashi me nandayla serial update avb

ताज्या बातम्या